बटर पनीर | Butter Paneer Masala In Just 1 Step

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आपल्या Marathi Dream World Recipes या वेबसाईट  Butter Paneer Masala ही रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी Main Menu  आयकॉनवर केल्यानंतर आपल्याला आपल्या मनपसंत भाषेत पाहता येईल सर्वप्रथम आपण Butter Paneer बद्दल थोडसं जाणून घेऊयात.

Butter Paneer Masala ह्या पाककलाकृतीला पनीर मखनी असेही म्हणतात हा पदार्थ प्रामुख्याने बटर (माखन) याला आपण मराठीमध्ये लोणी असेही म्हणतो आणि पनीर या या दोन पदार्थापासून केला जातो थोडासा तिखट आणि थोडासा गोड लागणाऱ्या या पदार्थाचा उगम हा भारताची राजधानी दिल्ली येथे झाला आहे. हा पदार्थ पनीर आणि बटर बरोबरच टोमॅटो ,काजू ,लाल तिखट, गरम मसाला यासोबत बरेचसे साहित्य वापरून बनवला जातो.

बटर पनीर या डिश चा शोध मोतीमहल रेस्टॉरंट मध्ये 1950 च्या दशकात कुंदन लाल जग्गी यांनी टोमॅटोच्या करीमध्ये ताजे लोणी मिसळून लावला चला तर मग मित्रांनो माहिती पुरेशी झाली अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आपल्या Butter Paneer Masala या रेसिपीला.

Butter Paneer Masala
Butter Paneer Masala

Butter Paneer Masala

ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य:-

 • चार टोमॅटो मोठे चिरलेले 
 • ८ ते १० लसणाच्या पाकळ्या
 • १ इंच आल्याचा तुकडा
 • २ चमचे कोथिंबीरीचे चिरलेले देठ
 • १ हिरवी मिरची
 • १ चमचा काश्मिरी लाल तिखट
 • १ चमचा धने पावडर
 • अर्धा चमचा जिरे पावडर
 • १५ ते २० काजू

ग्रेव्ही कशी बनवावी (How To Make Gravy) :-

मित्रांनो आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जी बटर पनीरची भाजी खातो ही भाजी बनवण्यासाठी त्या लोकांनी आधीपासूनच ३-४ प्रकारच्या ग्रेव्ही बनवून ठेवलेल्या असतात.मग त्या सगळ्या ग्रेवीचं कॉम्बिनेशन करून ढाबेवाले आपल्याला हवी ती भाजी ते बनवून देतात.

तर आज आपण जी बटर पनीरची भाजी पाहणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे आपण यासाठी कुठल्याही प्रकारची वेगळी तयारी करणार नाही आहोत आज आपण घरगुती पण हॉटेल पेक्षा जास्त सोपी आणि चविष्ट बटर पनीर मसाला रेसिपी बनवणार आहोत

सर्वप्रथम आपल्याला काजू १० ते १५ मिनिटे  गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत किंवा तुम्ही काजू ५ मिनिटे गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता.

त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ४ मोठे टोमॅटो , ८ ते १० लसणाच्या पाकळ्या, १ इंच आलं, कोथिंबीर चे देठ २ चमचे चिरलेले, १ हिरवी मिरची, काश्मिरी लाल तिखट दीड चमचा, धणे पावडर १ चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि शिजवून घेतलेले १५ ते २० काजू हे सगळे पदार्थ घालून आपल्याला पाणी न घालता या सगळ्या पदार्थांची घट्ट पेस्ट करून घ्यायची आहे.

पनीर मसाल्यासाठी लागणारे साहित्य:-

 • २ चमचे तेल
 • २-३ मोठे चमचे बटर
 • ५०० ग्रॅम पनीर
 • १ छोटा चमचा जिरे
 • ३ हिरवे वेलदोडे 
 • दालचिनीचा तुकडा अर्धा इंच
 • १ तमालपत्र 
 • १ चमचा बारीक चिरलेला लसूण 
 • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची 
 • ३ मध्यम आकाराचे कांदे मध्यम आकारात चिरलेले
 • हळद पावडर पाव चमचा
 • अर्धा छोटा चमचा साखर
 • अर्धा छोटा चमचा भाजून घेतलेली कसुरी मेथी
 • अर्धा छोटा चमचा गरम मसाला
 • ३ ते ४ चमचे फ्रेश क्रीम
 • २ ते ३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
 • गरजेनुसार गरम पाणी
 • चवीनुसार मीठ

आता आपली Butter Paneer बनवायची सर्व तयारी झालेली आहे. आता फक्त आपल्याला पनीरचे तुकडे गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचे आहेत आणि या ग्रेव्हीमध्ये कांद्यासोबत आणि थोड्या मसाल्यांसोबत थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत की झाला आपली पनीर बटर मसाला तयार.

Masala dosa Recipe 👈👈पहाण्यासाठी इथे क्लीक करा 

पनीर मसाला बनवण्याची कृती (How To Make Paneer Masala):-

तर आता आपण गॅसवर एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवू तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा बटर घालून घेऊ.

Oil & Butter

बटर थोडसं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये पाचशे ग्रॅम पनीर मोठ्या चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घालून घेऊ. यावर चवीनुसार मीठ आणि एक चिमूटभर काश्मिरी लाल तिखट टाकून घेऊ

paneer cubs

आता हलक्या हाताने आपल्याला पनीर हलवून घ्यायचा आहे पनीर हलवताना तुकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला पनीर फक्त एक ते दोन मिनिटं तेलामध्ये तळून घ्यायचे आहे यामुळे पनीर ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर आपला कडकपणा सोडत नाही आता हे पण एक आपण एका बाऊलमध्ये काढून बाजूला ठेवून घेणार आहोत जोपर्यंत पनीरचा मसाला तयार होत नाही तोपर्यंत.

Pav Bhaji Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

paneer in Bowl

मसाला बनवण्यासाठी पुन्हा आपण कढईमध्ये एक चमचा तेल घेऊन ती गॅसवर गरम करायला ठेवून देऊ तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा बटर टाकून घ्यायचा आहे बटर गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक छोटा चमचा जिरे तीन हिरवे वेलदोडे अर्धा इंच दालचिनी एक तमालपत्र एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा बारीक चिरलेली मिरची टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत.

Misal Pav Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

garam masala

त्यामध्ये तीन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत.

garam masala

आणि हे कांदे सुद्धा आपल्याला बारीक मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत एकदा कांद्याला सोनेरी रंग आला गॅस बारीक करून आपल्याला कांद्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा काश्मिरी लाल तिखट टाकून घ्यायचे आहे.

Chole Bhature Recipe In Marathi हि रेसिपी वाचण्यासाठी इथे क्लीक करा.

lalmirch with onion

आता हे सगळं मिश्रण अर्धा मिनिटे चमच्याच्या सहाय्याने हलवल्यानंतर ह्यात थोडासा पाण्याचा शिडकाव करावा आणि दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण चांगले हलवत राहून शिजवून घ्यावे.

fry onion

हे सगळे पदार्थ शिजल्यानंतर यामध्ये आपण बनवलेली ग्रेव्ही आपण टाकणार आहोत ग्रेव्ही टाकल्यानंतर आपण पुन्हा ही ग्रेव्ही थोडीशी हलवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चिमूटभर साखर टाकणार आहोत .

साखर टोमॅटोच्या आंबटपणाला बॅलन्स करते आता मध्यम मोठ्या आचेवर ही ग्रेव्ही दहा ते पंधरा मिनिटे हलवत हलवत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही शिजवताना सारखी सारखी हलवत राहावी ग्रेव्हीमध्ये आपण काजू चा वापर केल्यामुळे ही कढईला लागू शकते ही ग्रेव्ही तोपर्यंत हलवत राहायचे आहे जोपर्यंत या ग्रेव्हीला तेल सुटत नाही आणि ही ग्रेव्ही स्वतःहून तुमच्या कढईला सोडत नाही.

आता आपली ग्रेव्ही व्यवस्थित शिजलेली आहे तर आता आपण यामध्ये थोडसं गरम पाणी घालून दोन मिनिटे ग्रेव्ही हलवून घेऊ आता आपली ग्रेव्ही तयार आहे तर थोडीशी ग्रेव्ही टेस्ट करून पहा तिखट साखर मीठ बरोबर आहे की नाही.

Palak Paneer Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

आता आपण तळून घेतलेले पनीर या ग्रेव्हीमध्ये सोडणार आहोत ग्रेव्हीमध्ये पनीर घातल्यानंतर दोन मोठे चमचे बटर घालून घेऊ बटर नंतर एक चिमूटभर भाजलेल्या कसुरी मेथीची पावडर घालून घेऊ त्यानंतर एक चिमूटभर गरम मसाला घालून घेऊ गरम मसाला घातल्यानंतर आपण यात तीन ते चार मोठे चमचे फ्रेश क्रीम घालून घेऊ आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ.

panner gravy
panner gravy

या सगळ्या नंतर आपल्याला हलक्या हाताने हे मटर पनीर हलवून घ्यायचा आहे पनीर हलवताना तुटणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हलक्या हाताने हे सर्व मिश्रण मिक्स करून दोन ते तीन मिनिटे आपल्याला पनीर आणि ग्रेव्ही एकत्र शिजवून घ्यायची आहे आता आपण यावर पुन्हा ताजी चिरलेली कोथिंबीर गार्निश करूयात आता आपली बटर पनीर मसाला रेसिपी तयार झालेली आहे.

butter paneer masala
butter paneer masala

आताही गरमागरम डिश आपण सर्व करून घेऊ एका बाऊलमध्ये बटर पनीर मसाला काढून त्यावर एक बटरचा क्यूब ठेवूयात त्यावर फ्रेश क्रीम ने उभ्या आडव्या धारा काढून घेऊयात आणि त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आपली डिश खाण्यासाठी तयार आहे.

butter paneer masala
butter paneer masala

 

पनीर मसाला बनवण्यासाठीच्या काही प्रो टिप्स:-

 • पनीर मसाला हि एक स्वतःचाच स्वाद आणि सुगंध जपणारी भाजी आहे. शक्यतो या भाजीचं  कॉम्बिनेशन कुठल्याही मसालेदार पदार्थाबरोबर करू नये.
 • पनीर मसाला हि भाजी साधा जीरा राईस किंवा साधं नान यांच्याबरोबर सर्व्ह करावी.
 • पनीर मसाला सॉसी आणि स्मूदी बनवण्यासाठी काजूची ग्रेव्ही आणि टोमॅटोची ग्रेव्ही हि अतिशय स्मूद पेस्ट करावी मसाला जाडसर राहू देऊ नये.
 • बऱ्याचशा ठिकाणी कच्चा पनीर वापरण्याची पद्धत आहे पण आपण पनीर थोड्याशा तेलावर तोडा तळून  घेणार आहोत म्हणजे पनीर थोडासा कडक व्हावा आणि त्याचा शिजून गाळ होऊ नये.
 • शक्यतो paneer masala  मध्ये क्रिम घातल्यानंतर भाजी जास्त शिजवणे टाळावे पनीर मसाला फक्त गरम करावा.

सारांश:-

कशी वाटली आपली आजची Paneer Masala Recipe आम्हाला आपला अभिप्राय जरूर कळवा आम्ही आशा करतो कि आपल्याला हि रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि आपण घरी नक्कीच पनीर मसाला रेसिपी बनवून बघाल तर बनवत रहा, खात रहा आणि आम्हाला आपले प्रेम असेच देत रहा तुमचाच…..

Signing Off

Marathi Dream World Recipes 

4.9/5 - (10 votes)

1 thought on “बटर पनीर | Butter Paneer Masala In Just 1 Step”

Leave a Comment