Chole Bhature Recipe In Marathi

नमस्कार, मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण आपल्या Marathi Dream World या वेबसाईटवर Chole Bhature Recipe In Marathi ही रेसिपी पाहणार आहोत तर सर्वात आधी आपण छोले भटूरे बद्दल थोडीशी माहिती घेऊयात.

छोले भटूरे हा पदार्थ प्रामुख्याने पंजाब या प्रांतात खूप प्रसिद्ध आहे थोडक्यात म्हणायचं झालं तर ही एक पंजाबी डिश आहे पण तरीसुद्धा छोले भटूरे हे संपूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.

छोले भटूरे ही पंजाबी ढाब्यांबरोबरच दिल्लीच्या खाऊ गल्लीची पण शान आहे. छोले भटूरे बरोबर साम्य ठेवणारी महाराष्ट्रीयन डिश म्हणजे कुर्मा पुरी. फक्त या दोन्ही रेसिपींमध्ये थोडासा फरक आहे तो फरक काय आहे तर छोले भटूरे या प्रकारात भाजी ही फक्त छोल्यांपासून बनवलेली असते छोले म्हणजे त्यांना आपण मराठीमध्ये काबुली चणे असे पण म्हणतो पण कुर्मा पुरीतल्या  कुर्म्यामध्ये छोल्यांबरोबरच फ्लॉवर हि भाजीसुद्धा वापरलेली असते.

पुरी आणि भटूरे दोन्ही दिसायला समान जरी असले तरी भटूरे या प्रकारात मैदा अंबवण्याची म्हणजेच किण्वन करण्याची प्रक्रिया केली जाते. ती थोडीशी रासायनिक प्रक्रिया आहे. आपण सर्वांनी कधीतरी बाहेर छोले भटूरे खाल्ले असतीलच आणि अगदी नसतीलच खाल्ले  तरी किमान त्याचं नाव तरी ऐकलं असेल तर अशी ही प्रसिद्ध पाककलाकृती आज आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया Chole Bhature Recipe In Marathi ला.

Chole Bhature Recipe In Marathi
Chole Bhature In Marathi,
Chole Bhature,

 

Chole Bhature Recipe In Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ: ४-५ तास
बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
किती जणांसाठी : ४ ते ५ जण

Bhature साहित्य :-

 • ३ कप =मैदा (४०० ग्रॅम्स )
 • १ वाटी  = बारीक रवा (५० ग्रॅम्स)
 • १ वाटी  = दही ( १५० ग्रॅम्स)
 • अर्धा चमचा  साखर
 • अर्धा चमचा  मीठ
 • १ चमचा  बेकिंग सोडा
 • १ चमचा  तूप
 • गरजेनुसार पाणी
 • तेल तळण्यासाठी

Chole Masala साहित्य :-

 • १ कप = छोले (काबुली चणे) २५० ग्रॅम्स-८ ते ९ तास भिजवून घ्यावेत
 • २ मोठे कांदे बारीक चिरलेले
 • ४ मोठे टोमॅटो बारीक चिरलेले
 • ३ हिरव्या मिरच्या
 • आल्याचा तुकडा दीड इंच
 • ३ तमालपत्र
 • दालचिनीचा तुकडा दीड इंच
 •  मसाला वेलची २
 • हिरव्या वेलच्या ५
 • लवंग ५
 • तेल
 • चहा पावडर २ चमचे
 • हळद पाव चमचा
 • काश्मिरी लाल मिरची पूड अर्धा चमचा
 • गरम मसाला पावडर अर्धा चमचा
 • धणे पावडर १ चमचा
 • भाजलेली जिरे पावडर १ चमचा
 • पंजाबी छोले मसाला २ चमचे
 • अनारदाना पावडर २ चमचे
 • साखर १ चमचा
 • बेकिंग सोडा पाव चमचा
 • मीठ चवीनुसार
 • फोडणीसाठी : १ चमचा  तूप
 • काश्मिरी लाल मिरची पूड अर्धा चमचा
 • मधून चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या
 • १ इंच आल्याचे पातळ चिरलेले तुकडे

Bhature कृती:-

सर्वप्रथम दहा मिनिटे रवा गरम पाण्यात बुडेल इतक्या पाण्यात भिजवून ठेवावा फार पातळ करू नये. चाळणीत मैद्यामध्ये मीठ घालून चाळून घ्यावे मैद्यात एक चमचा तूप घालून हलक्या हाताने व्यवस्थित मैदा भरडून घ्यावा कणिक मळल्यासारखा मैदा मळू नये.

आता त्यात अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडाआणि अर्धा छोटा चमचा साखर घालून पीठ  एकत्र करून घ्यावे  असा भिजलेला रवा आणि दही घालून कणीक नीट मळून घ्यावी कणिक मळताना थोडे थोडे गरम पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे हाताला तेल लावून मैदा ताणून ताणून लवचिक करून मळून घ्यावा जास्त पाणी घालू नये फक्त दीड ते दोन चमचे पाणी वापरावे

आता ही कणिक एक सुती कापड गुंडाळून ते कापड भिजवून पिळून त्यात कणिक गुंडाळून ठेवावी चार ते पाच तासांसाठी. पाच तासानंतर आता आपण हे भटूरे लाटायला घेऊ.

हलक्या हाताने कणिक लांबून घ्या दोन बोटांच्या सहाय्याने त्याला पीळ घालून गोळे तोडून घ्या कणकेचा प्रत्येक गोळा हाताच्या पंजावर लवचिक करून घ्यावा त्यावर  भेगा राहू देऊ नये. प्रत्येक गोळ्याला तेल लावावे उरलेली कणीक कपड्यात गुंडाळून ठेवावी.

भटूरे लाटताना तेलाचा वापर करून त्यावर ती लाटावी पिठाचा किंवा मैद्याचा वापर करू नये. लाटताना एक काळजी घ्यावी ही गोळे मध्यभागी पातळ आणि कडांना जाडसर राहतील असेच लाटावेत.

कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यावे भटूरे तेलात घालण्यापूर्वी त्याच्या कडा ओढून थोड्या अजून लांब कराव्यात मगच तेलात भटूरे तळावेत झाऱ्याने भटुरा दाबावा म्हणजे वाफेमुळे भटुरा चांगला फुगतो दुसऱ्या बाजूने पलटून भटुरा चांगला खरपूस तळावा असे सगळे भटूरे तळून घ्यावेत.

Misal Pav Recipe In Marathi हि रेसिपी वाचण्यासाठी इथे क्लीक करा.

Chole Masala कृती:-

चहा पावडर एका सुती कपड्यात बांधून त्याची पुरचुंडी  बांधावी. छोल्यचे जास्तीचे पाणी काढून टाकून छोले कुकरमध्ये ३ कप पाणी, खडे मसाले (३ तमालपत्र, दीड इंच दालचिनीचा तुकडा, ३ मसाला वेलची, ५ हिरव्या वेलच्या, ५ लवंग) चिमूटभर मीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चहाची पुरचुंडी घालावी.

मोठ्या आचेवर १० मिनिटे छोले शिजवून ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावेत. कुकर थंड झाल्यानंतर छोल्यातले पाणी फेकून देऊ नये ते तसेच ठेवावे ते पाणी भाजी शिजवताना आपल्याला वापरात येईल.

आले, लसूण आणि मिरच्यांची पेस्ट मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. पेस्ट करताना पाणी वापरू नये. एका कढईत २ चमचे तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा त्यात मसाल्याची केलेली पेस्ट घालावी अर्धा चमचा हळद घालून २ मिनिटे परतून घ्यावी.

आता अनारदाना पावडर घालून २ मिनिटे परसावे त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व मीठ घालून पूर्ण शिजेपर्यंत ताटली झाकून शिजवावे. टोमॅटो पूर्ण शिजल्यावर त्यात काश्मिरी लाल मिरची पावडर, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि साखर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

५ ते ७ मिनिटे मसाला छान खरपूस परतून घ्यावा. मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात छोले आणि झाल्याचे राहिलेले पाणी व गरज असेल तर आणखीन अर्धा पेला पाणी घालून मध्यम आचेवर ५ मिनिटे छोले शिजू द्यावेत.

छोल्यांचा रस्सा थोडासा घट्ट झाल्यानंतर आपण त्याला तुपाची फोडणी देऊ. एका दुसऱ्या कढईमध्ये तूप गरम करून त्यात पातळ चिरलेले काप आणि २ हिरव्या मिरच्या घालून २ मिनिटे परतून घ्याव्यात ही फोडणी छोल्यांवर घातल्यानंतर गॅस बंद करून छोले वाढेपर्यंत झाकून ठेवावेत.

आता आपली Chole Bhature Recipe In Marathi ही तयार झालेली आहे. आता आपण या खमंग छोले भटूरे यांचा आस्वाद घेऊ शकता या छोल्यांबरोबर पंजाब मध्ये बुंदी का रायता ही रेसिपी पण वाढतात बुंदी का रायता ही रेसिपी आपण पुढील भागात कव्हर करू तोपर्यंत मजा घ्या Chole Bhature Recipe In Marathi या रेसिपीचा.

Pav Bhaji Recipe In Marathi हि रेसिपी वाचण्यासाठी इथे क्लीक करा .

Bhature उत्तम बनवण्यासाठी काही टिप्स:-

मैदा चाळणीमध्ये व्यवस्थित चाळून घ्यावा म्हणजे त्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि मैद्यामध्ये हवा खेळती राहून मैदा मोकळा होतो.

शक्यतो मैदा ताजाच वापरावा नाही मैदा कडवट लागू शकतो.

रवा मैद्यात मिसळताना रवा कोमट पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवावा म्हणजे रवा मैद्याशी  एकरूप होतो आणि भटूरे अगदी खुसखुशीत होतात.

भटुऱ्याच्या पिठाला फुगवण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरतो त्या वेळेला भटुऱ्याला थोडासा आंबटपणा येणे गरजेचे असते म्हणून २ ते ३ दिवसांपूर्वीचे लावलेले दही वापरावे म्हणजे असे दही आणि या पिठात मळलेला बेकिंग सोडा या कणकेवर प्रक्रिया करण्यासाठी मदत करतात त्यामुळे भटुऱ्याचे पीठ फुलून येते त्यामुळे भटूरे चांगले फुगतात.

या भटुरेच्या पिठाला कमीत कमी ४ ते ५ तास रेस्ट होऊ दिल्यानंतरच भटूरे बनवायला घ्यावेत म्हणजे आपले भटुरे एकदम ढाबा स्टाईल होतील.

Chole उत्तम बनवण्यासाठी काही टिप्स:-

छोले कमीत कमी ८ ते १० तास भिजवून घ्यावेत म्हणजे ते चांगले फुलून येतात अगदी नाहीच आले तर आपण उकळलेल्या पाण्यात अर्धा तास छोले भिजवू शकता.

छोले कुकरमध्ये शिजवताना त्यात आठवणीने चहा पावडरची पुरचुंडी अथवा ती बॅग घालावी म्हणजे छोल्यांना अगदी चांगला दाटसर काळपट रंग येतो.

अनारदानाची पावडर मार्केटमध्ये तयार मिळते अगदी आपल्याकडे तयार पावडर नसली तरी आपण डाळिंबाचे सुकवलेल्या दण्यांची पावडर करू शकता या पावडरमुळे छोल्यांना अजून दाट रंग येतो.

छोले चविष्ट होण्यासाठी मसाला चांगला परतून घेणे आवश्यक आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आणि टोमॅटो पूर्ण गाळ होईपर्यंत शिजवले गेले पाहिजेत हाच आपल्या Chole Bhature Recipe In Marathi चा बेस आहे.

सारांश:-

मित्रांनो आज आपण शिकलो छोले भटूरे इन मराठी ही रेसिपी बनवायला. आपल्याला ही रेसिपी नक्कीच आवडेल आशा आहे आपण या रेसिपीला पसंती दर्शवाल अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींसाठी फॉलो करा Marathi Drem World या वेबसाईटला तर चला तर मग बनवत रहा आणि खात राहा.

 

Signing of

Marathi Drem World

4.9/5 - (11 votes)

5 thoughts on “Chole Bhature Recipe In Marathi”

Leave a Comment