Misal Pav

नमस्कार, मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे आपला Marathi Dream World Recipes मध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध अगदी मराठमोळ्या चवीची Misal Pav रेसिपी.

मिसळपाव  म्हणलं की कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटत महाराष्ट्रीयन मिसळपाव हा अगदी सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. अहो मिसळपाव  जगभर इतका प्रसिद्ध आहे कि काय विचारता. मिसळपाव बद्दल महाराष्ट्रात अनेक वाद सुद्धा आहेत कि मिसळ पुण्याची कि सातारची, कोल्हापूरची, नाशिकची कि मुंबईची वाद कितीही असले तरी मिसळ आहे मराठी माणसाची ,मराठी मनाची.

असा हा मिसळपाव  महाराष्ट्राची जान आहे बाहेर तर आपण बऱ्याच वेळा मिसळपाव खातोच पण घरीसुद्धा अतिशय उत्तम चवीची अगदी झणझणीत मिसळपाव  आपण बनवू शकतो अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे मिसळ मिसळीशिवाय महाराष्ट्रीयन मेनू पूर्णच होत नाही मिसळीमध्ये मटकी ,वाटणे, फरसाण, कांदा,लिंबू शेव अशा अनेक पदार्थांचा भडीमार असतो प्रामुख्याने तिखट आणि झणझणीत असणारी मिसळ काही ठिकाणी थोडीशी गॉड थोडीशी आंबट देखील करतात. तर चला तर मग जाणून घेऊयात मिसळपाव कसा बनवायचा ते.

Misal pav

Misal Pav Recipe In Marathi 

Misal Pav साहित्य:-

 • १ वाटी मोड आलेली मटकी
 • अर्धी वाटी ओला वाटाणा
 • १ बटाटा माध्यम आकाराचा चिरलेला
 • तेल तळण्यासाठी
 • २ मोठे चिरलेले आणि १ बारीक चिरलेला कांदा
 • २ बारीक चिरलेले टोमॅटो
 • फरसाण
 • पातळ पोह्यांचा चिवडा
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • लिंबू
 • लादी पाव ८ नग
 • बारीक शेव गार्निशसाठी

कट बनवण्यासाठी साहित्य :-

 • ३-४ लसूण पाकळ्या
 • १ इंच आल्याचा तुकडा
 • १ चमचा जिरं
 • १ चमचा मोहरी
 • २-३ काळे मिरी
 • १ लहान दालचिनीचा तुकडा
 • ओलं  खोबरं पाव वाटी
 • २-३ लवंगा
 • १ तमालपत्र
 • १ चमचा जिरेपूड
 • १ चमचा धनेपूड
 • ४-५ लहान चमचे काश्मिरी लाल तिखट
 • १ चमचा हळद
 • २ मोठे चमचे कांदा लसूण मसाला
 • १ चमचा गोड मसाला
 • १ चमचा गरम मसाला
 • १चमचा सुहाना मिसळ मसाला
 • फोडणीसाठी तेल
 • मीठ चवीनुसार

Chole Bhature Recipe In Marathi हि रेसिपी वाचण्यासाठी इथे क्लीक करा.

कृती:-

मिसळ बनवण्यासाठी काही पूर्वतयारी करणे आवश्यक असते  मटकी रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवावी. मटकी रात्रभर चॅन भिजली कि तिला एका स्वच्छ सुटी फडक्यात बांधून मोड येण्यासाठी ठेवून द्यावे जर आपल्या मटकीला मोड आलेले असतील तर आता आपण मिसळ पाव बनवायला सुरुवात करू शकता.सर्वप्रथम मोड आलेली मटकी आणि ओले वाटणे कुकर मध्ये थोडा पाणी आणि हळद टाकून २ शिट्ट्या काढून शिजवून घ्यावी.

आता एका कढई मध्ये २/३ चमचे तेल गरम करून घ्या त्यात मोठा चिरलेला कांदा आणि आलं आणि लसणाची पेस्ट टाका कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या मग त्यात चिरलेला टोमॅटो टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत तो सुद्धा भाजून घ्या.

आता त्यात साल काढलेल्या बटाट्याचे तुकडे टाका नंतर उकड काढलेली मोड आलेली मटकी आणि वाटाणा सुद्धा टाकून परतून घ्या आता यात अर्धा चमचा हळद, २ मोठे चमचे कांदा  लसूण मसालाआणि चवीनुसार मीठ घालून घ्या.चांगला परतून झाल्यानंतर थोडासा पाणी टाकून कढई वर ताट ठेवून वाफ काढून घ्या आता आपली मटकीची उसळ तयार आहे.

जिरं, मोहरी,लवंग,दालचिनी,ओलं खोबरं आणि तमालपत्र  हे सगळं मिश्रण भाजून घेऊन त्यात थोडासा पाणी घालून मिक्सर मध्ये थोडं जाडसर वाटून घ्या

Palak Paneer Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

आता दुसऱ्या कढई मध्ये ४ मोठे चमचे तेल टाकून गरम करून घ्या त्यात हे वाटण टाकून घ्या चांगला परतून झाल्यानंतर आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा धने पावडर, १ चमचा जिरे पावडर,अर्धा चमचा हळद, गोडा मसाला एक चमचा आणि काश्मिरी लाल तिखट टाकून परतून घ्या.

आता यात मोठा दीड तांब्या पाणी घाला आणि आता २० ते २५ हे मिश्रण चांगला कट सुटेपर्यंत उकळून घ्या. आता तुमचा कट रस्सा तयार झालेला आहे

आता हा कात रस्सा आपण जी मटकीची उसळ तयार करून घेतली होती त्यात टाकून चांगला उकळू द्या.आता आपण मिसळ ची प्लेटिंग करू शकतो. आता एका पसरत प्लेट मध्ये फरसाण काढून घ्या त्यावर थोडा पातळ पोह्यांचा चिवडा टाकून घ्या आणि त्यावर आता आपण बनवलेली मटकीची उसळ आणि कट रस्सा टाकून घ्या.

मग त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या त्यावर थोडीशी बारीक शेव टाका आणि दुसऱ्या प्लेट मध्ये पाव बारीक चिरलेला कांदा  आणि त्यावर चिरलेला लिंबू ठेवून सर्व्ह करा.

अशा प्रकारे आपला Misal Pav ची डिश तयार झालेली आहे. आता या चवदार आणि झणझणीत मिसळ पाव चा आस्वाद घेऊ शकता.

Pav Bhaji Recipe In Marathi वाचण्यासाठी येथे क्लीक करा

टिप्स:-

 • जर कुणाला दही मिसळ खायला आवडत असेल तर आपण या मिसळ वर दहाही सुद्धा घालून खाऊ शकता
 • काही लोकांना चीज मिसळ पण खूप आवडते ते यात अमूल चीज चा वापर पण करू शकतात.
 • मिसळ हि झणझणीतच छान लागते पण आज आपल्याला जास्त तिखट चालत नसेल तर आपण तिकिटाचा वापर कमी करू शकता.

Masala Dosa Recipe In Marathi पाहण्यासाठी इथे क्लीक करा .

सारांश:-

आज आपण Misal Pav कसा बनवायचा हि रेसिपी मराठीत शिकलो आशा आहे आपल्याला हि थोडीशी वेगळ्या प्रकारची रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही घरी हि रेसिपी नक्की करून पाहणार आहात अशाच प्रकारचा स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीस घेऊन येणार आहोत आपल्या या https://marathidreamworld.com/ या वेबसाईटवर. असाच प्रेम देत रहा बनवत रहा आणि खात रहा.

 

Signing Off

Marathi Dream World

 

 

 

 

4.9/5 - (14 votes)

3 thoughts on “Misal Pav”

Leave a Comment