No1 Masala Dosa Recipe In Marathi

नमस्कार, मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आपल्या Marathi Dream World Recipes या वेबसाईटवर Masala Dosa Recipe In Marathi पाहणार आहोत.

सर्वप्रथम मसाला डोसा म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात .मसाला डोस्याला मसाले दोसे असं सुद्धा म्हणतात ही एक साउथ इंडियन डिश आहे हा जो मसाला डोसा आहे याचं मूळ गाव उडपी हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. डोसा बनतो तांदूळ, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, मेथी दाणे आणि पोह्यांपासून सुकलेली  लाल मिरची आणि बटाट्याच्या भाजी, चटणी आणि सांबार यांच्याबरोबर हा डोसा सर्व केला जातो.

Masala Dosa जसा साउथ इंडिया मध्ये फेमस आहे तसा तो संपूर्ण भारतभर देखील तितकाच प्रसिद्ध आहे आणि नुसता भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. उडपीचा हा Masala Dosa याची बऱ्याच शहरांमध्ये वेगवेगळे  प्रकार तयार होतात कुठे दावणगिरी लोणी डोसा बनवतात तर कुठे पेपरडोसा बनवतात आता तर हल्ली चीज डोसा सुद्धा मार्केटमध्ये आला आहे. डोस्याचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललेल आहे.

पण उडपीचा ऑथेंटिक डोसा अजूनही तसाच, तितकाच प्रसिद्ध आहे. ऑथेंटिक परफेक्ट Masala Dosa कसा बनवतात. त्याचा परफेक्ट बॅटर कसं बनवतात आणि बटाट्याची मसालेदार भाजी परफेक्ट कशी बनवायची हे आज आपणआपल्या रेसिपी मध्ये Masala Dosa त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी आणि कांदा टोमॅटो याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या Masala Dosa Recipe In Marathi बनवायला.

Masala Dosa Recipe In Marathi
No 1 Masala Dosa Recipe In Marathi

Masala Dosa Recipe In Marathi

Perfect Masala Dosa Batter

साहित्य:-

 • ३ वाटी डोसा राईस (मोती राईस)
 • १ वाटी उकडा तांदूळ
 • १ वाटी उडदाची डाळ
 • पाव वाटी पोहे
 • अर्धा चमचा मेथी दाणे
 • अर्धा छोटा चमचा साखर
 • मीठ चवीनुसार

कृती:-

सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ आणि डाळींना एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. आता यात भरपूर पाणी घालून आपल्याला डाळ आणि तांदूळ जोपर्यंत व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत ३-४ वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत.

तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुऊन झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका आणि नंतर त्यात पोहे आणि मेथी दाणे टाका आणि आता पुन्हा यात भरपूर पाणी टाकून हे मिश्रण ७ ते ८ तासांसाठी भिजवून ठेवा. ७ ते ८ तासानंतर आता आपली डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजून फुगले असतील. आता यातलं पाणी काढून टाका आणि आता हे मिश्रण वेट ग्राइंडर मध्ये ओतून घ्या. जर तुमच्याकडे वेट ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सरचा वापर सुद्धा करू शकता.

आता या मिश्रणामध्ये दोन लहान पेले पाणी टाका आणि एकदम बारीक सर वाटून घ्या जास्त घट्ट सुद्धा नको आणि जास्त पातळ सुद्धा नको. बॅटर घट्ट किंवा पातळ करण्यासाठी पाण्याचे प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता. आता एक मोठं भांड घ्या ज्याची हाईट जास्त असेल कारण या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकल्यानंतर ज्यावेळेस याची आंबवण्याची म्हणजेच किण्वन प्रक्रिया पूर्ण होते त्यावेळेस हे बॅटर  फुगून वर येते.

आता या मोठ्या भांड्यात आपलं मिश्रण काढून घ्या त्यात एक अर्धा छोटा चमचा साखर आणि  एक चमचा मीठ टाकून घ्या. आणि हे बॅटर मोठ्या चमच्याने व्यवस्थित एक ते दोन मिनिटे ढवळून व्यवस्थित झाकून एखाद्या गरम जागेवर ८ ते १० तासांसाठी ठेवून घ्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बॅटर  ८ ते १० तासात फर्मेंट होतं पण थंडीच्या मोसम मध्ये हे बॅटर  फर्मेंट व्हायला १० ते १२ तास लागतात.

जर तुम्हाला सकाळी नाष्ट्यामध्ये डोसे बनवायचे आहेत  तर आदल्या दिवशी दुपारी तुम्ही डाळ तांदूळ भिजत घालून संध्याकाळी त्याचं बॅटर बनवून फर्मेंट करायला ठेवू शकता म्हणजे सकाळपर्यंत तुमचं बॅटर तयार होईल.

आता आपलं बॅटर तयार झालेलआहे सुरुवातीला आपण बॅटरमध्ये एक चमचा मीठ टाकलं होतं आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण दिलेलं साहित्याचं  प्रमाण यात २० ते २२ डोसे होतात जर तुम्हाला १०-१२ च करायचे असतील तर तुम्ही साहित्याचे प्रमाण अर्ध करू शकता. आता डोसे बनवायच्या आधी आपण डोस्याची भाजी बनवून घेऊयात आणि चटण्या बनवून घेऊयात आणि सर्वात शेवट डोसे बनवूयात.

Chole Bhature In Marathi हि रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लीक करा

डोशाची बटाट्याची भाजी

batatyachi bhaji for dosa
batatyachi bhajii ,aalo ki sabji for dosa

साहित्य:-

 • २ चमचे तेल
 • अर्धा छोटा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा उडदाची डाळ
 • अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ
 • अर्धा चमचा काजू (Optional )
 • अर्धा छोटा चमचा हिंग
 • ३ बारीक चिरलेल्या मिरच्या
 • १ चमचा किसून बारीक केलेलं आलं
 • १ चमचा जाडसर बारीक केलेला लसूण
 • ७-८ कढीपत्त्याची पाने
 • ३ मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरलेली
 • अर्धा लिटर गरम पाणी
 • ४ मिडीयम साईजचे उकडलेले बटाटे
 • चवीनुसार मीठ
 • अर्धा छोटा चमचा हळद
 • एक चिमूटभर साखर

कृती:-

एका कढईमध्ये २ चमचे तेल टाकून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ, अर्धा चमचा काजू, काजू ऑप्शनल आहेत मध्यम आचेवर हे सगळं सोनेरी रंग येईपर्यंत तळा. एकदा डाळीला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा हिंग, ३ बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या, १ चमचा बारीक किसून घेतलेला आलं,. १ चमचा जाडसर बारीक केलेला लसूण आणि ८-१० कढीपत्त्याची पाने टाकून घ्या.

आता हे मिश्रण २ ते ३ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. आता यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा टाका आता हे मिश्रण आपल्याला अजून ५ ते ७ मिनिटे त्यातला कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ झाल्यानंतर यात आपल्याला अर्धा लिटर गरम पाणी टाकायचे आहे या पाण्याबरोबर कांद्याला आपल्याला ३ ते ४ मिनिटे उकळू द्यायचं आहेम्हणजे या पाण्यात कांद्याचा सगळं स्वाद उतरेल. आणि आता यामध्ये ४ माध्यम आकाराचे उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकायचे आहेत.

आता आपल्याला यात चवीनुसार मीठ,अर्धा छोटा चमचा हळद आणि चिमूटभर साखर टाकून घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर तोपर्यंत शिजवायचे  आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही अधून मधून हे मिश्रण हलवत राहावे आता ७ ते ८ मिनिटानंतर आपल्या भाजीतलं पाणी आटलेलं आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या. आपली डोस्यासाठीची परफेक्ट बटाट्याची भाजी आता तयार आहे.

Misal Pav हि रेसिपी मराठीमध्ये पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

Coconut chuttny (ओल्या नारळाची चटणी)

नारळाची चटणी ,coconut chutney

साहित्य:-

 • १ वाटी बारीक किसून घेतलेला ओला नारळ
 • पाव वाटी हरभऱ्याची भाजकी डाळ
 • २ हिरव्या मिरच्या
 • चवीनुसार मीठ
 • अर्धा छोटा चमचा जिरे पावडर
 • अर्धा छोटा चमचा काळीमिरी पावडर
 • १ लहान वाटी  पाणी
 • फोडणीसाठी  २ चमचे तेल
 • अर्धा छोटा चमचा मोहरी
 • अर्धा छोटा चमचा हरभऱ्याची डाळ
 • अर्धा छोटा चमचा उडदाची डाळ
 • ६ ते ८ कढीपत्त्याची पाने
 • २-३ सुक्या लाल मिरच्या

कृती:-

एका मिक्सरच्या भांड्यामध्ये १ वाटी बारीक किसून घेतलेला ओला नारळ, पाव वाटी हरभऱ्याची भाजकी डाळ, २ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरे पावडर, अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर यात अर्धी वाटी पाणी ओतून मिक्सरवर बारीक करून घ्या. हे बारीक झालेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या.

फोडणीसाठी एका छोट्या कढईमध्ये २ चमचे तेल घाला तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी घाला  मोहरी तडतडल्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा हरभऱ्याची डाळ, अर्धा छोटा चमचा उडदाची डाळ घाला या डाळी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या नंतर त्यात ६ ते ८ कढीपत्त्याची पाने आणि २-३ सुक्या लाल मिरच्या टाका मिरच्या तळून थोड्या कडक झाल्यानंतर ही फोडणी लगेच बाऊलमध्ये काढलेल्या मिश्रणावर टाकून घ्या आता आपली ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे.

Pav Bhaji Recipe In Marathi वाचण्यासाठी येथे क्लीक करा

Onion Tomato Chutney (कांदा टोमॅटो चटणी)

Onion Tomato Chutney
Onion Tomato Chutney,कांदा टोमॅटो चटणी

साहित्य:-

 • ५ चमचे तेल
 • २ चमचे हरभऱ्याची डाळ
 • २ चमचे उडदाची डाळ
 • १२-१५ कढीपत्त्याची पाने
 • १२-१५ लसणाच्या पाकळ्या
 • २ इंच आल्याचा तुकडा
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • २चमचे कोथिंबीरीच्या काड्या
 • ३-४ सुकलेल्या काश्मिरी लाल मिरच्या
 • २ मध्यम आकाराचे मोठे चिरलेले कांदे
 • ४ मध्यम आकाराचे टोमॅटो
 • चवीनुसार मीठ
 • अर्धा छोटा चमचा मोहरी
 • अर्धा छोटा चमचा हरभऱ्याची डाळ
 • अर्धा छोटा चमचा उडदाची डाळ
 • ६ ते ८ कढीपत्त्याची पाने
 • अर्धा छोटा चमचा हिंग

कृती:-

एका छोट्या कढईमध्ये २ ते ३ चमचे तेल घ्या तेल गरम झाल्यानंतर त्यात २ चमचे हरभऱ्याची डाळ, २ चमचे उडदाची डाळ टाकून घ्या या डाळी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या डाळींना सोनेरी रंग आल्यानंतर यात १२-१५ कढीपत्त्याची पाने, १२-१५ लसणाच्या पाकळ्या, २ इंच आल्याचा तुकडा चिरून ३ ते ४ हिरव्या मिरच्या, २ चमचे कोथिंबीरच्या काड्या, ३ ते ४ सुकलेल्या काश्मिरी लाल मिरच्या हे सर्व मिश्रण २ ते ३ मिनिटे चमच्याने हलवत मंद आचेवर परतून घ्या.

आता यात २ मध्यम आकाराचे मोठे चिरलेले कांदे टाकून घ्या कांदे  घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत हलवायचे आहे जोपर्यंत कांदा शिजून मऊ होत नाही. कांदा शिजून मऊ झाल्यानंतर यात ४ मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घाला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्या आणि कढईवर झाकण ठेवून कमी आचेवर १२ ते १५ मिनिटं टोमॅटो गाळ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे.

१२-१५ मिनिटानंतर या सगळ्या वस्तू व्यवस्थित गाळ झाल्या असतील आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये विना पाणी टाकता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.

फोडणीसाठी आता एका लहान कढईमध्ये २ चमचे तेल टाकून घ्या. तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा हरभऱ्याची डाळ आणि अर्धा छोटा चमचा उडदाची डाळ टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. डाळीला सोनेरी रंग आल्यानंतर यात ६ ते ८ कढीपत्त्याची पाने आणि अर्धा छोटा चमचा हिंग टाकून घ्या. आता ही फोडणी बाऊलमध्ये काढलेल्या कांदा टोमॅटोच्या पेस्ट वर टाकून घ्या. आता आपली कांदा टोमॅटो चटणी तयार झालेली आहे.

Dosa Recipe (डोसा)

डोसा बनवण्याची खरी पद्धत म्हणजे डोसा हा कास्ट आयर्न च्या तव्यावर बनवला जातो हा तवा सिझनिंग केलेला असतो सिझनिंग म्हणजे गरम तव्यावर तेल टाकून पाणी मारून तवा रापवलेला असतो आता जर आपल्याकडे सीजनिंग केलेला कास्ट आयर्नचा तवा नसेल तर आपण डोसे नॉनस्टिक तव्यावर पण करू शकता पाहुयात परफेक्ट Masala Dosa कसा बनवायचे ते.

कृती:-

सर्वप्रथम नॉनस्टिक तवा गॅसवर गरम करायला ठेवा. तव्याचं टेंपरेचर जास्त असू नये म्हणून गॅस मंद आचेवर ठेवा म्हणजे डोसा फिरवताना बेटर तव्याला सोडून त्याचे तुकडे होऊन शेप बिघडणार नाही आणि डोसे व्यवस्थित होतील.

डोस्याला शेप देण्यासाठी एक सपाट तळाची वाटी घ्या. एक वाटी बेटर तव्याच्या मध्यभागी ओतून घ्या आणि क्लॉक वाईस म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हलक्या हाताने वाटीने गोल हळूहळू फिरवत डोसा जितका जास्त मोठा करता येईल तितका मोठा करा. एकदा तुमचं बेटर तव्यावर सेट झाल्यानंतर यावर बटर पसरवा. बटर लावताना थोडं जास्त लावा आणि हा डोसा तोपर्यंत तव्यावर भाजू द्या जोपर्यंत हा कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचा होत नाही.

बटर जास्त वापरल्यानेडोसा हा छान कुरकुरीत होईल आणि त्याला छान सोनेरी रंग सुद्धा येईल एकदा का डोशाला सोनेरी रंग आला की डोश्याच्या मध्यभागी आपली बटाट्याची भाजी घाला आणि डोस्याचा गोल रोल करा आता एका मोठ्या प्लेटमध्ये बटाट्याची भाजी घातलेला डोसा ठेवा त्यासोबत एका छोट्या वाटीमध्ये खोबऱ्याची चटणी आणि दुसऱ्या छोट्या वाटीमध्ये कांदा टोमॅटोची चटणी घालून सर्व कराआता आपली Masala Dosa हि रेसिपी संपूर्ण तयार झालेली आहे.

टिप्स:-

 • डोसा बनवताना बॅटरमध्ये चिमूटभर साखर घातल्याने डोसा हा कुरकुरीत होऊन त्याला मस्त सोनेरी  येतो.
 • आपल्याला जर चीज डोसा आवडत असेल तर आपण यावर प्रोसेस्ड चीज किसून घालू शकतो.
 • बटाट्याची भाजी परफेक्ट बनवण्यासाठी त्यात पाणी घालून उकळणे गरजेचे आहे म्हणजे भाजी अगदी सॉफ्ट बनते.

सारांश:-

आज आपण परफेक्ट मसाला डोसा कसा बनवायचा हे शिकलो आशा करतो आपल्याला हि रेसिपी नक्कीचआवडली असेल आणि तुम्ही या सगळ्या रेसिपीस घरी करून पाहणार आहात.अशाच पध्धतीच्या छानछान चविष्ट आणि रुचकर रेसिपीस आमी आपल्यासाठी घेऊन येणार आहोत आपल्या या https://marathidreamworld.com/ या वेबसाईट वर तर बनवत राहा खात राहा आणि आम्हाला पसंत करत राहा.

 

5/5 - (15 votes)