Famous Palak Paneer Recipe 1 Easy Recipe In Multi Language

नमस्कार,मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपल्या Marathi Dream World या वेबसाईटवर Palak Paneer Recipe घेऊन आलो आहोत आपल्या मनपसंत भाषेमध्ये आपण Main Menu मधून आपल्याला हवी ती भाषा निवडू शकता.

सर्वप्रथम आपण Palak Paneer Recipe बद्दल थोडीशी माहिती घेऊयात. पालक पनीर हे पालकच्या गुळगुळीत भाजीमध्ये पनीरचे छोटे छोटे क्यूब टाकून तयार केलेला पंजाबी खाद्यपदार्थ आहे.

जिभेची चव वाढवणारा हा खाद्यपदार्थ पंजाब मध्येच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. हा पदार्थ जितका स्वादिष्ट आहे तितकाच तो औषधीही आहे.

Palak Paneer हि भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे चला तर मग पाहूयात Palak Paneer Recipe कशी बनवायची ते.

Masala dosa Recipe 👈👈पहाण्यासाठी इथे क्लीक करा 

Palak Paneer Recipe
Palak Paneer Recipe, easiest palak paneer recipe., perfect palak paneer, palak paneer masala, home made palak paneer recipe.

Palak Paneer Recipe

साहित्य:-

 • पालक ची एक पेंडी
 • दोन चमचे तेल
 • दोन चमचे लोणी
 • एकच आमचा बारीक चिरलेला लसूण
 • एक चमचा बारीक चिरलेला आलं
 • अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
 •  दोन बारीक चिरलेल्या मिरच्या
 • अर्धा चमचा जिरे पावडर
 • एक चमचा मिरची पावडर
 • 200 ग्रॅम पनीर क्यूब
 • चवी नुसार मीठ
 • फ्रेश क्रीम दोन ते तीन चमचे

कृती:-

सर्वप्रथम पालक पनीर बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूयात. आता आपण पालकची एक पेंडी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊयात. आता ही धुतलेली पाने एका स्वच्छ सुती फडक्याने पुसून कोरडी करून घेऊयात.

आपल्याला पालक शिजवून घ्यायचा नाहीये ,आता ही कोरडी करून घेतलेली पाने आपण उकळत्या पाण्यामध्ये एक ते दीड मिनिटांसाठी टाकूयात, उकळत्या पाण्यातून दीड मिनिटानंतर आपण हा पालक काढून घेऊन बर्फाच्या थंड पाण्यामध्ये घालून घेऊयात. असं केल्याने पालक चा रंग आणि त्याची चव वाढते.

आता आपण यात थंड पाण्यातून पालक काढून घेऊन हाताच्या सहाय्याने पालक थोडासा पिळून घेऊ. पूर्ण पिळून त्यातलं सगळं पाणी काढायची आवश्यकता नाहीये. पालक पिळून काढलेले पाणी फेकून देऊ नका त्याचा वापर आपण पुढे करणार आहोत.

Pav Bhaji Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

आता एका आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पनीरचे लहान लहान तुकडे फ्राय करून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत.

यामुळे पनीर जास्त गाळ होत नाही आणि त्याचे तुकडे पडत नाहीत.तळून झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे तुकडे एका बाऊलमध्ये काढून घेऊ. जर तुम्हाला तळलेलं पनीर आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. आणि रेसिपीसाठी कच्च पनीर वापरू शकता.

आता ही पालकची पिळून घेतलेली पाने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून पालकची बारीक पेस्ट करून घ्या, पेस्ट करून झाल्यानंतर गॅस वर एक कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेऊ.

तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेऊ, जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे बटर टाकून घेऊयात. आता बटर मध्ये आपण बारीक चिरलेला लसूण टाकूयात या रेसिपी मध्ये बारीक चिरलेल्या लसणाला खूप महत्त्व आहे कारण या लसणाच्या फ्लेवरमुळे पालक पनीरला खूप छान चव येते.

आता बटर मध्ये टाकलेला हा लसूण आपल्याला अगदी कमी आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. लसणाला सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला यात एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे.

आता यामध्ये अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं घालून घेऊयात, आता यात आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात. कांद्याला आपल्याला पूर्ण सोनेरी रंगावर तळायचं नाहीये फक्त एक ते दोन मिनिटे कांदा मऊ होईपर्यंत म्हणजे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात.

कांद्याला गुलाबी रंग आल्यानंतर आपण केलेली पालकची पेस्ट यामध्ये घालून घेऊयात. हे मिश्रण आपल्याला  मंद आचेवर थोडा वेळ चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे. एक ते दोन मिनिटानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायच आहे.

मिठानंतर आपण यात एक चमचा काश्मिरी लाल तिखट टाकून घेऊयात तिखटानंतर आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे पावडर टाकून घेऊयात आपला पालक आपण आधीच अर्धवट शिजवून घेतला होता तर आता याला जास्त शिजवून घ्यायचं नाहीये.

Misal Pav Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

आता या पालकमध्ये आपण तळून घेतलेले पनीरचे क्युब्स टाकून घेऊयात. पनीर टाकून घेतल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे मिश्रण हलवताना पनीरचे तुकडे तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे.

मिश्रण व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये तीन मोठे चमचे फ्रेश क्रीम टाकायचं आहे क्रीम  टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला क्रीम शिजवायचं  नाही आहे तर फक्त गरम करायच आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊ.

आता आपली पालक पनीरची रेसिपी तयार झालेली आहे आता हे पालक पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ प्लेट  मध्ये काढल्यानंतर गार्निश साठी त्याच्यावर चमच्याच्या सहाय्याने फ्रेश क्रीमच्या धारा धारा काढून घेऊ आणि त्यावर एक बटरचा तुकडा टाकून देऊ आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर ठेवूयात आता आपली पालक पनीर रेसिपी ही डिश सर्व्ह  करण्यासाठी तयार आहे.

टिप्स:-

 • पालक पनीर घट्ट बनवण्यासाठी रेसिपी मध्ये पाणी घालू नये क्रीम जास्त वापरावे.
 • आपआपल्या आवडीप्रमाणे तुम्ही पनीर फ्राय करून किंवा कच्च सुद्धा वापरू शकता.
 • जर कुणाला पालक पनीर मध्ये थोडासा कडवटपणा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा कसुरी मेथीचा पण वापर करू शकता.

सारांश:-

तर आज आपण आपल्या वेबसाईट वर पालक पनीर बनवायला शिकलो हि पालक पनीर ची सर्वात सोप्पी रेसिपी आहे.आशा करतो तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्ही नक्की घरी करून पहा तर बनवत रहा खात रहा आणि आम्हाला पसंत करत रहा.

Signing off

Marathi Dream World Recipes

 

 

4.9/5 - (11 votes)