Pav Bhaji Recipe In Marathi

नमस्कार,

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोतPav Bhaji Recipe In Marathi कशी बनवायची ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात Pav Bhaji  बद्दल Pav Bhaji चा जन्म महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात झाला. मुंबई मधील street food म्हणून प्रसिद्ध असणारी पाव भाजी आता जवळ जवळ भारतभर प्रसिद्ध झाली आहे. Pav Bhaji  म्हणजे अनेक प्रकारच्या भाज्यांचा मिश्रण असणारी भाजी आणि त्यासोबत मसालेदार पाव.

Pav Bhaji जशी strret food म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती अनेक पार्ट्यांची  पण जान आहे. लहान मुलांना अनेक भाज्यांची चव पसंत नसते तर अशा भाज्या आपण Pav Bhaji मधल्या भाजीत मिश्रण करून लहान मुलांना खाऊ घालू शकतो Pav Bhaji जशी चवीला स्वादिष्ट आहे तसेच तिचा सुगंध सुद्धा अगदी भूक लावणारा आहे तर चला मित्रांनो सुरु करूयात आपण आजची Pav Bhaji Recipe In Marathi बनवायला.

Pav Bhaji Recipe In Marathi
Pav Bhaji Recipe, Pav Bhaji Masala, Pav Bhaji ingredients’

Pav Bhaji Recipe In Marathi

 • पूर्व तयारीचा वेळ:- १५ मिनिटे.
 • बनवायचा वेळ:-२५ मिनिटे.
 • किती जणांसाठी :- ३ जण .

साहित्य:-

 • बारीक चिरून २ मोठे बटाटे (अंदाजे दोन  कप)
 •  हिरवे वाटाणे /२ कप (ताजे किंवा गोठलेले)
 •  तुकडे केलेले फुलकोबी ३/४ कप (सुमारे १/४ फुलकोबी)
 •  चिरलेली गाजर १/२ कप (सुमारे १ मध्यम)
 • बारीक चिरलेला १ मोठा कांदा (सुमारे ३/४ कप)
 • आले लसूण पेस्ट १ चमचा
 • बारीक चिरलेले  २ मध्यम टोमॅटो (सुमारे १- १/२ कप)
 • सिमला मिरची चिरलेली १/२ कप (सुमारे १ लहान)
 • लाल तिखट १-१/२ चमचा  (किंवा कमी)
 • हळद पावडर १/४ चमचा
 • धणे-जिरे पावडर १ चमचा
 • तयार पावभाजी मसाला पावडर १ चमचा
 • लिंबू अर्धा कापलेला
 • चवीनुसार मीठ
 • तेल  २ चमचे
 • अमूल बटर २ चमचे , सर्व्ह करण्यासाठी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर २ चमचे
 • लादी पाव ८ सर्व्ह करण्यासाठी

Chole Bhature Recipe In Marathi हि रेसिपी वाचण्यासाठी इथे क्लीक करा.

Pav Bhaji Recipe In Marathi कृती:-

सर्व भाज्या पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने  पुसून घ्या आणि लहान लहान तुकडे करा.  ३ लिटर क्षमतेच्या प्रेशर कुकरमध्ये फ्लॉवर, गाजर, चिरलेले बटाटे, आणि हिरवे वाटाणे घाला . १ कप पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. प्रेशर कुकरचे झाकण बंद करून मध्यम आचेवर २ शिट्ट्या वाजू द्या. गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्या. कुकरची संपूर्ण हवा गेल्यानंतर  झाकण उघडा; यास सुमारे ८-१० मिनिटे लागतील. उकडलेल्या भाज्या बटाटा स्मॅशरच्या मदतीने स्मॅश  करा. भाजीचा घट्ट पातळपणा हा तुम्ही भाज्या कश्या पध्धतीनी स्मॅश केल्या आहेत त्यावर अवलंबून असेल ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता.

कढईत २ चमचे  तेल आणि २ चमचे  बटर एकत्र मध्यम आचेवर गरम करा. चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घाला. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. चिरलेला टोमॅटो, चिरलेली सिमला मिरची आणि चवीनुसार मीठ घाला. सिमलाआणि टोमॅटो मिरची हलके मऊ होईपर्यंत तळून घ्या आणि भाजी चमच्याने हलवत २ मिनिटे शिजू द्या. नंतर ३/४ कप पाणी घाला, चांगले मिसळा आणि ३ ते ४ मिनिटे शिजू द्या आता उकडलेल्या भाज्या आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला.

चांगले हलवा आणि ४ ते ५ मिनिटे शिजू द्या. आता भाजीचा आस्वाद घ्या आणि आवश्यक असल्यास आणखी मीठ घाला आणि चांगले हलवा  गॅस बंद करा. चिरलेली कोथिंबीर घालून सजवा. भाजी सर्व्ह करायला तयार आहे.

चाकूच्या साहाय्याने लादी पाव  अर्ध्यामधून अशा प्रकारे कापून घ्या की ते संपूर्ण कापले जाणार नाहीत आणि त्याचे दोन तुकडे होणार नाहीत . पॅन मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तव्यावर १ चमचा  बटर लावा, त्यावर पावांचे तुकडे  दोन्ही बाजूंनी हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या , प्रत्येक बाजूला भाजण्यासाठी  सुमारे 30 सेकंद लागतील. भाजलेला पाव एका प्लेटमध्ये ठेवा आणि शिल्लक राहिलेले पाव त्याच प्रकारे भाजून घ्या. एका प्लेटमध्ये भाजी काढा, बुट्टेरचे तुकडे चिरलेला कांदा,टोम्याटोच्या कापलेल्या रिंग्स  आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करा आणि बाजूला पाव ठेवून सर्व्ह करा.

तुमच्या आवडीनुसार वांगी, ब्रोकोली, फ्रेंच बीन्स, कॉर्न इत्यादी भाज्या तुम्ही चवीमध्ये बदल करण्यासाठी घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार (भाज्यांच्या तुकड्यांसह किंवा त्याशिवाय) उकडलेल्या भाज्या मॅश करू शकता. भाजीला गडद लाल रंग येण्यासाठी तुम्ही नेहमीच्या लाल तिखटाच्या ऐवजी काश्मिरी लाल तिखट वापरू शकता आणि त्यात थोड्या बिट चा रस घालून उकळू शकता.

Misal Pav हि रेसिपी मराठीमध्ये पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

टिप्स:-

तुम्हाला जर चीज आवडत असेल तर तुम्ही गार्निशसाठी मोझरेला चीज वापरून चीज Pav Bhaji सुद्धा बनवू शकता.

जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटर भरपूर प्रमाणात वापरू शकता आणि बटर ऐवजी घरी काढलेला लोणी जरी असेल तरीही तुम्ही वापरू शकता.

बाजारात बऱ्याच प्रकारचे Pav Bhaji मसाले उपलब्ध आहेत त्यापैकी सुहाना पाव भाजी मसाला, बादशहा पावभाजी मसाला, किंवा प्रवीण चा पाव भाजी मसाला हे मसाले प्रसिद्ध आहेत तुमच्या पावभाजीची चव वाढवण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता किंवा पाव भाजी मसाला तुम्ही घरात पण बनवू शकता.

सारांश:-

तर या Pav Bhaji Recipe In Marathi मध्ये आपण शिकला असाल कि उत्कृष्ठ चवीची Pav Bhaji  आपण कशा प्रकारे बनवू शकता आणि जर आपणास काही शंका असतील तर आपण आम्हाला कंमेंट करून विचारू शकता आशा आहे हि Pav Bhaji Recipe In Marathi आपणास आवडली असेल अशाच पध्धतीच्या छानछान चविष्ट आणि रुचकर रेसिपीस आमी आपल्यासाठी घेऊन येणार आहोत आपल्या या https://marathidreamworld.com/ या वेबसाईट वर तर बनवत राहा खात राहा आणि आम्हाला पसंत करत राहा.

 

Signing off

Marathi Dream World

 

5/5 - (13 votes)

6 thoughts on “Pav Bhaji Recipe In Marathi”

Leave a Comment