Perfect Dum Aloo Make In 1 Easy Steps-परफेक्ट दम आलू बनवा एका सोप्प्या स्टेप्स मध्ये

नमस्कार, मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या या मराठी ड्रीम वर्ल्ड या वेबसाईट वर आज आपण पाहणार आहोत Dum Aloo  हि रेसिपी बनवायच्या ५ सोप्प्या स्टेप्स.जेणेकरून तुम्हीपण Dum Aloo या रेसिपीचा आनंद आणि चव आपल्या घरी बसून घेऊ शकता.

मित्रांनो, हि रेसिपी आपण menu icon  वर क्लीक देऊन आपण आपल्या मनपसंत आपल्याला हव्या त्या भाषेत बघू शकता हि रेसिपी आपल्याला मराठी, पंजाबी, हिंदी, English ,तामिळ, तेलगू ,गुजराथी आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

मित्रांनो सर्वप्रथम आपण दम आलूच्या इतिहासाबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. Dum Aloo हा एक उत्तर भारतीय पदार्थ आहे विशेष करून काश्मिरी दम आलू हा पदार्थ भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.

या पदार्थाबद्दल अशी कथा आहे कि हा पदार्थ सर्वप्रथम मुघल काळात बनवला गेला होता अकबर बादशहाच्या काळात त्यांचा दरबार हा इतर कलांबरोबरच खान-पान चविष्ट पदार्थ यांच्यासाठी सुद्धा प्रसिद्ध होता. या डिश चा नाव Dum Aloo हे सुद्धा याच दरबाराच्या स्वयंपाक पद्धतीवरून आलेलं आहे.

चला तर मग मित्रांनो सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला .

Perfect Dum Aloo Recipe

Perfect Dum Aloo Make In 5 Easy Steps

साहित्य:-

 • अर्धा किलो बटाटे (५००ग्रॅम ) लहान आणि गोल 
 • आवश्यकतेनुसार पाणी 
 • चवीनुसार मीठ 
 • आवश्यकतेनुसार मोहरीचे तेल (मोहरीचे तेल आवडत नसेल तर तुम्हाला आवडेल ते तेल वापरू शकता )
 • मोठे वेलदोडे २ नग 
 • हिरवे वेलदोडे ४ नग 
 • दालचिनीचा तुकडा २ इंच 
 • अर्धा छोटा चमचा जिरे 
 • २ तमालपत्र 
 • ४-५ लवंगा 
 • काश्मिरी लाल तिखट ३ चमचे 
 • आवश्यकतेनुसार गरम पाणी 
 • १ छोटा चमचा हिंग 
 • २ चमचे बडीशेप पावडर 
 • १ चमचा सुंठ पावडर 

कृती:-

एका प्रेशर कुकरमध्ये बटाटे टाका आणि त्यानंतर भरपूर पाणी आणि चिमूटभर मीठ टाका, बटाटे 1 शिट्टी देऊन मोठ्या आचेवर शिजवा आणि मग गॅस बंद करा आणि कुकरची हवा नैसर्गिकरित्या कमी होऊ द्या.

Boiled Aloo for Dum Aloo
Boiled Aloo for Dum Aloo

पुढे कुकरमधून बटाटे बाहेर काढा आणि थंड झाल्यावर सोलून घ्या, नंतर काटा चमचा  किंवा टूथपीक वापरून बटाट्यांमध्ये होल  करा, यामुळे तळताना बटाटे व्यवस्थित आतून तळले जातील.

boiled & pilled Aloo

बटाटे तळण्यासाठी आचेवर कढई ठेवा आणि त्यात ५०० ग्रॅम मोहरीचे तेल घाला, जेव्हा तुम्ही बटाटे घालाल तेव्हा बटाटे झाकण्यासाठी तेल पुरेसे असावे.
गॅस फुल ठेवा आणि तेलातून गरम वाफा  येईपर्यंत गरम करा आणि नंतर गॅस कमी करा आणि तेल थोडे थंड होऊ द्या.

oil for potato frying

नंतर तेलात बटाटे घाला आणि बटाट्यांना सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या आणि मध्यम आचेवर सर्व बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

frying aloo

बटाटे तळून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्या आणि त्यांना थंड होऊ द्या, पुन्हा एकदा टूथपिक किंवा काटा चमचा वापरून बटाट्यांना होल करून घ्या.

fried potato

यामुळे मसाले आणि ग्रेव्ही बटाट्यांमध्ये शिरण्यास मदत होईल  जेणेकरून ते आतून चवदारआणि मसालेदार होतील, तुमचे तळलेले बटाटे दम आलू बनवण्यासाठी तयार आहेत 

एका खलबत्यामध्ये २ काळे वेलदोडे, ४ हिरवे वेलदोडे आणि दालचिनीचा २ उंचच तुकडा  घाला आणि त्यांना थोडंसं  कुटून घ्या जेणेकरून वेलदोडे आणि दालचिनी थोडीशी जाडसर बारीक होईल हा  बारीक करू  राहू द्यावा.

पुढे रस्सा बनवण्यासाठी पहिले जे ५०० ग्रॅम तेल आपण घेतले होते त्यातले थोडे तेल काढा आणि राहिलेले तेल कढईत गरम करा.

त्यात जिरे, तमालपत्र, लवंगा आणि ठेचलेले मसाले टाका, एका वेगळ्या भांड्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडरमध्ये गरम पाणी टाकून तिखटाची पेस्ट तयार करा व्यवस्थित मिक्स करून हि पेस्ट गरम तेलाच्या कढईमधे घाला आणि मसाले आणि काश्मिरी तिखट परतून घ्या आणि १-२ मिनिटे कमी आचेवर शिजवा. 

masala
masala

नंतर त्यामध्ये  हिंग,  बडीशेप पावडर आणि सुंठ पावडर घालून नीट ढवळून घ्या आणि मध्यम आचेवर ३ मिनिटे शिजवा.

सुंठ पावडर
सुंठ पावडर

नंतर तळलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ घालून साहाय्याने नीट हलवून  घ्या,हे सगळं मिश्रण माध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवा फक्त बटाटे झाकले जाईपर्यंत यामध्ये आता गरम पाणी ओता आणि आता ४ ते ५ मिनिटे शिजू द्या 

गरम पाणी घालणे
गरम पाणी घालणे

ग्रेव्हीला उकळी आली की, कढईला झाकण लावा आणि झाकणावर थोडे वजन ठेवा, दम शिजवण्यासाठी तुम्ही कढई झाकण्यासाठी फॉइल पेपर किंवा गव्हाच्या पिठाच्या कणकेचा सुद्धा वापर करू शकता.

नंतर हे दम आलू तम्ही झाकण ठेऊन २० ते २५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. शिजल्यावर झाकण काढून टाकल्यावर तुम्हाला दिसेल की ग्रेव्ही कमी झाली आहे, अस्सल दम आलूची ग्रेव्ही दाट असते. परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार ग्रेव्हीला पातळ किंवा घट्ट करू शकता.

दम अळू उकळू द्या

आता तुम्ही स्वादिष्ट , चविष्ट ,चवदार,मसालेदार Dum Aloo हि रेसिपी तयार आहे आता हे म आलू एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्या आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करा त्यावर  चिरलेले अर्धे लिंबू ठेवा आणि किंवा नं सोबत किंवा रोटी, पुरीसोबत पण सर्व्ह करू शकता.

प्रो टिप्स:-

 • बटाटे अगदी लहान आणि गोल आकाराचे घ्यावेत म्हणजे ते व्यवस्थित तळले पण जातात आणि मसालासुद्धा त्यामध्ये पूर्ण आतपर्यंत जातो.
 • बटाट्यांच्या साली काढण्याआधी त्यांना व्यवस्थित शिजवून घ्या म्हणजे बटाटे चॅन तळले जातील आणि चॅन मसालेदार पण होतील.

Dal khichadi Recipe पाहण्यासाठी येथे क्लीक करा .

निष्कर्ष:-

 • Dum Aloo हि काश्मीर मधली एक फेमस आणि चवदार रेसिपी आहे यात काही गोष्टी काळजीपूर्वक केल्या म्हणजे बटाट्याची निवड आणि मसाल्याचा दाटपणा आणि त्याचे प्रमाण याकडे जर व्यवस्थित लक्ष दिला तर आपण आपल्याला हवी तशी परफेक्ट Dum Alooरेसिपी बनवू शकतो.
 • तुमच्या चवीला अनुसरून तुम्हाला हव्या त्या पदार्थाबरोबर तुम्ही डाँ आलू सर्व्ह करू शकता.
 • Dum Aloo ची हि रेसिपी बनवायला अतिशय सोप्पी आणि चविष्ट आहे हि रेसिपी तुम्ही घरीच बनवून आपल्या घरच्यांना आणि आपल्या मित्रांना जेवायला घालून खुश करू शकता.

तर मग बनवणार ना घरी Dum Alooआपल्याला आजची हि दम आळूची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मग नक्की करून पहा.बनवत रहा खात रहा आणि आपले आशीर्वाद आम्हाला असेच देत रहा.

This recipe made by shef sanjyot keer

Dum Aloo Recipe 👈👈👈video  पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

Signing Off

Marathi Dream World Recipes

4.3/5 - (10 votes)

1 thought on “Perfect Dum Aloo Make In 1 Easy Steps-परफेक्ट दम आलू बनवा एका सोप्प्या स्टेप्स मध्ये”

Leave a Comment