How To Make Rajma Chawal: 5 Secrets reviled:राजमा चावल

नमस्कार,मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आपल्या मराठी ड्रीम वर्ल्ड वेबसाईट वर  पाहणार आहोत Rajma Chawal रेसिपी हि रेसिपी आपण आपल्याला हव्या त्या आपल्या मनपसंत भाषेमध्ये पाहू शकता जस्ट Main Menuवर क्लीक करा आणि आपल्याला हवी ती भाषा निवड हि रेसिपी मराठी, हिंदी, English ,तामिळ, तेलगू, पंजाबी, गुजराथी आणि उर्दू इतक्या भाषांमध्ये उपलब्ध आहे,

सर्वप्रथम आपण Rajma Chawall  बद्दल थोडीशी माहिती घेऊयात.

Rajma Chawal हि एक लोकप्रिय उत्तर भारतीय डिश आहे ज्यामध्ये दाटसर ,घट्ट , चवदार ग्रेव्हीमध्ये शिजवलेले लाल किडनी बीन्स (राजमा) ज्याला आपण मराठीमध्ये लाल घेवडा असेही म्हणतो  याऐवजी वाघ्या घेवडा घेतलात तरी चालतो.

तर या लाल  घेवड्याची भाजी  म्हणजे राजमा हा बासमती  तांदळाच्या भाताबरोबर खाल्ला जातो म्हणून या एकत्रीकरणाला Rajma Chawal म्हणतात हा राजमा चावलं संपूर्ण भारतभर खूपच प्रसिद्ध आहे आणि सर्व वयोगटातील लोक हा राजमा चावलं खूप आवडीने खातात. 

या डिशचा उगम पंजाब राज्यात झाला, पंजाब हे राज्य त्याच्या समृद्ध पाक कलाकृतींसाठी ओळखला जातो. राजमा चावलने तेव्हापासून लोकप्रियता मिळवली आहे आणि आता ती देशभरातील अनेक घरांमध्ये एक प्रमुख पदार्थ आहे. जगभरातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये देखील Rajma Chawal हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो

Rajma Chawal तयार करण्यासाठी, लाल किडनी बीन्स रात्रभर भिजवल्या जातात आणि नंतर जिरे, धणे, हळद आणि गरम मसाला यासह सुगंधी मसाल्यांच्या मिश्रणाने शिजवल्या जातात. राजम्यामध्ये मसाल्यांचा स्वाद मुरेपर्यंत ते मऊ होईपर्यंत उकळले जातात, ज्यामुळे घट्ट आणि जाडसर ग्रेव्ही तयार होते.

.Rajma Chawal अनेकदा ताज्या कोथिंबिरीने सजवला जातो आणि लोणचे, दही किंवा साइड सॅलड सारख्या सोबत दिले जाते. हे एक पौष्टिक आणि आपल्याला आवडेल असं  जेवण आहे जे कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांचे चांगले संतुलन आपल्याला देते. तर  Rajma Chawal कसा बनवायचा ते.

Rajma Chawal
Rajma Chawal

How To Make Rajma Chawal

तयारीची वेळ: १५-२० मिनिटे (भिजण्याची वेळ वगळून)
पाककला वेळ: ४०-४५ मिनिटे
किती जणांसाठी : ४ ते ५ जणांसाठी 

साहित्य:-

 • उकडून घेतलेला राजमा दिड  वाटी- 250 ग्रॅम
 • पाणी आवश्यक तेवढे 
 • मीठ एक चिमूटभर
 • तेल ६-७ मोठे चमचे 
 • कांदे ३ मध्यम आकाराचे (उभे पातळ कापलेले)
 • जिरे १ चमचा 
 • २ तमालपत्र 
 • दालचीनीचा तुकडा १ इंच.
 • १ मोठी मोठी वेलची 
 • आल्याचा तुकडा १ इंच बारीक किसून घेतलेला 
 •  ७-८ लसणाच्या पाकळ्या
 • हळद पावडर पाव चमचा 
 • ४  टोमॅटो 
 • मीठ चवीपुरते 
 • काश्मिरी लाल मिरची पावडर १ चमचा 
 • तिखट लाल मिरची पावडर १ चमचा 
 • धणे पावडर २ चमचे 
 • जिरे पावडर १ चमचा 
 • गरम मसाला  चमचा
 • गरम पाणीआवश्यकतेनुसार 
 • भाजलेली कसुरी मेथी १ चिमूटभर 
 • गरम मसाला १ चिमूटभर
 • कोथिंबीर बारीक चिरलेली 

Dum Aloo👈👈👈 हि रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

कृती:-

राजमा पाण्याने चांगले धुवा आणि 4-5 तास भिजवा, तुम्ही गरम पाण्यात 2 तास भिजवू शकता.

भिजवलेले राजमा
भिजवलेले राजमा

प्रेशर कुकरमध्ये भिजवलेले राजमा घाला, राजमाच्या वर १-१.५ इंच पाणी घाला, नंतर मीठ घाला आणि झाकण लावा,

rajma in cooker
rajma in cooker

गॅस फुल ठेवा आणि पहिली शिट्टी झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि आणखी २ शिट्ट्या देऊन १० ते १५ मिनिटे शिजवा आणि नंतर गॅस बंद करा आणि कुकरची वाफ आपोआप जाऊ द्या .तुमचे उकडलेले राजमा तयार आहेत.

उकडलेले राजमा
उकडलेले राजमा

आता का कढई मध्ये २ चमचे तेल गरम करा तेल गरम झाल्यानंतर यात उभा पातळ चिरलेला कांदा घाला कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत ४ ते ५ मिनिटे तळून घ्या.

तळलेला कांदा
तळलेला कांदा

हा तळलेला कांदा  एका  गाळणीमध्ये गाळणीमध्ये घेऊन चमच्याच्या साहाय्याने दाबून घेऊन यातले एक्सट्रा तेल काढून घ्या.

एक्सट्रा तेल
एक्सट्रा तेल

तळलेले कांदे मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यात घाला आणि पाणी घाला, कांदे बारीक वाटून घ्या आणि तुमची तपकिरी कांद्याची पेस्ट तयार आहे.हि  पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्या.

आता मिक्सर च्या भांड्यात ४ हिरव्या मिरच्या , ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा याची पाणी न घालता पेस्ट करून घ्या.आता हि पेस्ट एका  वाटीमध्ये काढून घ्या.

आता आपल्याला शेवटी मिक्सर  भांड्यात ४ टोमॅटो चिरून घालायचे आहेत यात थोडं पाणी घालून टोमॅटोची प्युरी करून घ्या.

टोमॅटोची प्युरी
टोमॅटोची प्युरी

गॅसवर मोठ्या आचेवर एक कढई गरम करा नंतर यामध्ये २ ते ३ चमचे तेल घाला आणि तेल देखील चांगले तापू द्या. तेल गरम झाल्यावर यामध्ये १ चमचा जिरे, २   तमालपत्र, १ इंच दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची थोडीशी कुटून घाला वेलचीची पावडर  करू नका हे सर्व मसाले चमच्याच्या साहाय्याने हलवून तेलात व्यवस्थित भाजून घ्या.

मसाले
मसाले

पुढे आले लसूण मिरचीची पेस्ट घाला, आलं ,लसूण,मिरचीच्या पेस्टला २ ते ३ मिनिटे व्यवस्थित हलवून छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि मध्यम आचेवर थोडा वेळ शिजवा, नंतर यामध्ये पाव चमचा  हळद पावडर घाला, हलवा आणि काही सेकंद परतून घ्या. नंतर यामध्ये टोमॅटो प्युरी घाला प्युरी व्यवस्थित हलवून घ्या.

नंतर टोमॅटो प्युरीमध्ये चवीनुसार मीठ, २ चमचे काश्मिरी लाल तिखट, १ चमचा तिखट असलेले लाल तिखट दीड चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून हलवून घ्या  यामध्ये आपण केलेली सोनेरी कांद्याची पेस्ट घाला, नीट ढवळून घ्या आणि या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हलवून १० ते  १२ मिनिटे मसाला व्यवस्थित परतून घ्या.

लाल तिखट दीड चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावड
लाल तिखट दीड चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर

मसाला थोडा कोरडा झाल्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला आणि पुन्हा याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या.ग्रेव्हीला तेल सुटले की पाण्यात उकडलेले राजमा टाका आणि ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घ्या आणि एक उकळी येऊ द्या.

आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला
आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला

राजमाला उकळी आली की राजमा झाकून ठेवा आणि मध्यम आचेवर २०-२५ मिनिटे शिजवा आणि अधून मधून हलवत रहा. २०-२५  मिनिटे राजमा शिजवल्यानंतर ग्रेव्ही थोडी घट्ट होईल आणि त्याचा रंगही थोडा डार्क होईल, आता ग्रेव्ही आणखी थोडी दाटसर बनवण्यासाठी राजमाला चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने मॅश करा आणि १-२ मिनिटे शिजवून घ्या.

तुमच्या आवडीनुसार मीठ चाखून घ्या आणि त्यात चिमूटभर कसुरी मेथी, चिमूटभर गरम मसाला, ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आपला राजमा छान मिसळून घ्या

चिमूटभर कसुरी मेथी, चिमूटभर गरम मसाला,
चिमूटभर कसुरी मेथी, चिमूटभर गरम मसाला,

.आपला स्वादिष्ट राजमा तयार आहे.

आपला स्वादिष्ट राजमा तयार आहे.
आपला स्वादिष्ट राजमा तयार आहे.

आता हा राजमा सर्व्ह करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घ्या त्यावर कांद्याच्या रिंग्स ठेवा त्यावर एक चमचा  तूप घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करा 

परफेक्ट राजमा ५ सिक्रेट टिप्स:

१)  किडनी बीन्स रात्रभर भिजवून ठेवावेत म्हणजे ते व्यवस्थित  शिजतात आणि मऊ होतात ते मऊ झालेत कि नाही याची खात्री करून घ्या.शक्यतो कुकरमध्ये राजमा शिजवताना तो ओव्हरकूक होऊ देऊ नका.

२)  राजम्याची ग्रेव्ही व्यवस्थित बनवण्यासाठी आपण ३ माध्यम आकाराचे कांदे आणि ४ माध्यम आकाराचे टोमॅटो घेतले होते तुम्हीपण हेच प्रमाण वापर अगदी जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तरीसुद्धा याच प्रमाणात वाढवा.

३)  आपण जो कांदा  तळून घेऊन त्याची पेस्ट बनवली होती त्यांनी राजम्याला चांगला फ्लेवर येतो हि स्टेप स्किप करू नका.

४)  आपल्या चवीनुसार सगळ्या मसाल्यांचे प्रमाण हिरव्या मिरचीचे प्रमाण कमीजास्त करा.

५)  राजम्यासाठी भात बनवताना तांदूळ बासमती किंवा दावत बासमती तांदूळ वापरा आणि त्या भाताची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात जिरे, लवंग,दालचिनी, तमालपत्र आणि मिरे यांचा वापर करू शकता.

Veg Pulao 👈👈👈हि रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

सारांश:-

शेवटी, Rajma Chawal ही भारतीय पाककलाकृतीमध्ये खूप प्रसिद्ध आणि चवदार डिश आहे, ती त्याची  समृद्ध चव, राजमा बीन्स आणि सुवासिक तांदूळ यांच्या या आयकॉनिक कॉम्बिनेशनने जगभरातील खाद्यप्रेमींची मने जिंकली आहेत.

पंजाबमध्ये मूळ असलेल्या Rajma Chawal ने  प्रादेशिक सीमा ओलांडल्या आहेत आणि संपूर्ण भारत आणि संपूर्ण जगातल्या घरांमध्ये आणि रेस्टॉरंट्समध्ये ती एक प्रिय रेसिपी बनली आहे. ही एक अशी डिश आहे जी कुटुंबांना एकत्र आणते

सुगंधी मसाल्यांनी भरलेली मलईदार आणि चवदार राजमा ग्रेव्ही मऊ बासमती तांदळाच्या भाताबरोबर खायला खूप छान लागते..

शिवाय, Rajma Chawal केवळ एक स्वादिष्ट पाककृतीच नाही तर पौष्टिकअन्न देखील आहे . राजमा आणि तांदूळ यांचे मिश्रण कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांचे चांगले संतुलन देते. हे एक पौष्टिक आणि परिपूर्ण जेवण आहे जे शरीराच्या पोषक तत्वांची गरज पूर्ण करते. 

चला तर मग लागा तयारीला घाला तुमचा ऍप्रन आणि चला किचन मध्ये तुम्हाला आपली Rajma Chawal हि रेसिपी नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो तर मग बनवर रहा खात रहा आणि आपले आशीर्वाद आम्हाला देत रहा म्हणजे आम्ही अशाच छान छान रेसिपीस तुमच्यासाठी घेऊन येत राहू.

Signing Off

Marathi Dream World Recipes

 

Rajma Chawal चा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

 

 

4.9/5 - (9 votes)

Leave a Comment