Upvas Special Perfect Sabudana Khichdi Make In Just 5 Minute Only:साबुदाणा खिचडी उपवास स्पेशल

नमस्कार,मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आपल्या मराठी ड्रीम वर्ल्ड वेबसाईट वर  पाहणार आहोत Sabudana Khichdi रेसिपी हि रेसिपी आपण आपल्याला हव्या त्या आपल्या मनपसंत भाषेमध्ये पाहू शकता जस्ट Main Menuवर क्लीक करा आणि आपल्याला हवी ती भाषा निवडा हि रेसिपी मराठी, हिंदी, English ,तामिळ, तेलगू, पंजाबी, गुजराथी आणि उर्दू इतक्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर सर्वप्रथम आपण Sabudana Khichdi विषयी  थोडी माहिती घेऊयात.

साबुदाणा खिचडी हा साबुदाण्यापासून बनवलेला एक लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे, जो कसावा नावाच्या झाडाच्या मुळापासून बनवला जातो हे झाड प्रामुख्याने जंगलात आढळत असल्याने या मुळाला कंदमुळ असेही म्हणतात. Sabudana Khichdi हि जास्तकरून धार्मिक उपवास कालावधीत किंवा नाश्ता किंवा स्नॅक आयटम म्हणून वापरली जाते. साबुदाणा अत्यंत पौष्टिक आहे आणि त्यात कार्बोहायड्रेट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा चांगला समतोल आहे.

साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी,साबुदाणा मऊ आणि पारदर्शक होईपर्यंत पाण्यात भिजवला जातो . नंतर तो पाण्यातून  काढून टाकला  जातो आणि जिरे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, बटाटे यासारखे विविध साहित्य वापरून बनवली जाते. तिखटपणा येण्यासाठी कधी यामध्ये लाल तिखट कधी मिरच्या वापरल्या जातात आपल्या चवीनुसार.

साधारणपणे देवाच्या देवळात प्रसादासाठी जी खिचडी बनवली जाते त्यामध्ये लाल टाकताच वापर जास्त होतो आणि ती चवीला पण अतिशय उत्तम लागते  त्याचबरोबर या डिशमध्ये मीठ, साखर आणि कधीकधी लिंबाचा रस मिसळला जातो. आणि दह्याबरोबर खिचडी अतिशय चविष्ट लागते.

Sabudana Khichdi सामान्यतः उपवासाशी संबंधित असली तरी, ती नाश्त्यासाठी किंवा वर्षभर हलके जेवण म्हणून लोकप्रिय पदार्थ बनली आहे. त्याचे ग्लूटेन-मुक्त आणि शाकाहारी स्वभाव हे आहारातील निर्बंध असलेल्या व्यक्तींसाठी योग्य बनवते. याव्यतिरिक्त, उपवासाच्या कालावधीत ते त्वरित ऊर्जा प्रदान करते आणि शरीराचे पोषण करते असे मानले जाते.

एकूणच, Sabudana Khichdi हा एक चविष्ट आणि अष्टपैलू डिश आहे जी एक अद्वितीय पाककृतीचा अनुभव देते. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या आपल्या Sabudana Khichdi च्या रेसिपीला 

Sabudana Khichdi

How To Make Sabudana Khichdi

तयारीची वेळ: 10 मिनिटे (भिजण्याची वेळ वगळून)
बनवण्याची वेळ: 10-15 मिनिटे
किती जणांसाठी : ३ ते ४ जणांसाठी 

साहित्य:-

 • साबुदाणा दीड वाटी (१५०ग्रॅम )
 • पाणी १ तांब्या 
 • शेंगदाणे १ वाटी (१०० ग्रॅम )
 • तेल २ चमचे 
 • जिरे २ छोटे चमचे 
 • हिरवी मिरची २ ते ३ बारीक चिरलेली 
 • बटाटा २ उकडून मोठे तुकडे केलेले 
 • मीठ चवीनुसार 
 • साखरअर्धा चमचा 
 • लिंबाचा रस चवीनुसार 
 • दही ४ चमचे (ऑप्शनल )

कृती:-

मी दीड वाटी चांगल्या दर्जाचा साबुदाणा घेतला आहे.साबुदाणा चाळणीत घाला. चाळणीत घातल्यानंतर छान धुवून घ्या.साबुदाणा स्वच्छ पाण्यामधून ३ ते ४ वेळा धुवून घ्या.असं ३-४ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे साबुदाण्यातला स्टार्च निघून जातो आणि साबुदाणा एकमेकांना चिकटत नाही. आणि आपली खिचडी छान मोकळी-मोकळी होते.

साबुदाणा धुतल्यानंतर साबुदाण्याची सगळं स्टार्च पाण्यामध्ये आला असेल हे पाणी काढून टाका आणि साबुदाणा दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्याया भांड्यात आपण दीड वाटी साबुदाणा घातला आहे तर यामध्ये आता दीड वाटीच पाणी घाला.

आता ह्या भांड्यावर ताटली ठेवून ते झाकून ठेवा आणि ४-५ तास व्यवस्थित भिजू द्या. साबुदाणा व्यवस्थित भिजवणे फार महत्वाचे आहे.साबुदाणा छान भिजला कि तो भरपूर पाणी शोषून घेतो आणि त्यामुळे खूप छान गोल फुगतो आणि असा छान फुगला कि मग त्याची खिचडी असो कि वडे सगळं काही छान बनते.

साबुदाणा व्यवस्थित भिजण्यासाठी नेहमीचा वेळ ४-५ तास असतो. पूर्णपणे खात्री करण्यासाठी, साबुदाणा ६ तास भिजवा. साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजला जाईल.नेहमी साबुदाणा भिजवण्यासाठी जितका साबुदाणा घ्याल तितकेच पाणी वापर म्हणजे साबुदाणा भिजण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही.

साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे कि नाही हे कसे ओळखावे ते मी तुम्हाला सांगतो ६ तासानंतर आपण ज्यावेळेला साबुदाण्याच भांडं उघडून पाहू त्यावेळेला साबुदाणा हाताने दाबून बघा तो खूप मऊ झाला असला पाहिजे साबुदाण्याची तळाशी पाणी शिल्लक नकोय.आणि साबुदाणा अगदी मोकळा झाला असला पाहिजे एकमेकांना चिकटत नसला पाहिजे ह्या अवस्थेत साबुदाणा परफेक्ट भिजला आहे असा समजा.

आता आपला साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे आता आपण पुढची तयारी करूयात.आता आपण पहिल्यांदा दोन बटाटे उकडून त्याचे मोठे तुकडे करून घेऊयात आणि आता १ वाटी शेंगदाणे भाजून घेऊयात.शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका ताटलीत काढून घ्या थंड होण्यासाठी शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याचे सालपटे काढून घ्या आता ३-४ मिरच्या बारीक चिरून घ्या.

आता आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊयात यासाठी आपले एक वाटी भाजून सालपटे काढून घेतलेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि आपल्याला आता ह्या जाडसर कूट करायचा आहे.फार पावडर नाही करायची आहे.आता आपण हा शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यामध्ये टाकून घेऊयात त्याचबरोबर याच साबुदाण्यात आपण चवीनुसार मीठ पण टाकून घेऊयात.

आता आपण एका गॅसवर कढई गरम करायला ठेउयात.या कढई मध्ये २ चमचे तेल गरम करूयात या तेलामध्ये २ छोटे चमचे जिरे टाकून घेऊयात जिरे तडतडल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घेऊयात.मिरच्या टाकून झाल्यानंतर यामध्ये आपण उकडून मोठे चिरलेले बटाटे टाकून घेऊयात.

आता हे सगळं साहित्य उलथन्याच्या साहाय्याने हलवून घेऊयात २-३ मिनिटानंतर आपण यामध्ये साबुदाणा टाकून घेऊयात जरासा साबुदाणा हलवून घेतल्यानंतर आपण यामध्ये २ छोटे चमचे साखर टाकून घेऊयात.आणि आपल्याला हा साबुदाणा झाकण न ठेवता आता १०-१२ मिनिटे हलवत राहायचा आहे.

झाकण का ठेवायचे नाही कारण झाकण ठेवल्यानंतर साबुदाणा लवकर शिजतो पण तो चिकट होऊन त्यामध्ये गाठी होतात.आपल्याला साबुदाणा अगदी मोकळा व्हायला हवा म्हणून त्यावर झाकण न ठेवता हलवत राहायचा आहे .सतत हलवत राहा नाहीतर साबुदाणा कढईला खाली चिकटू शकतो.

थोड्या थोड्या वेळानी साबुदाणा दाबून बघत रहा साबुदा पूर्ण मऊ झाला आणि थोडा पारदर्शी झाला म्हणजे आपली Sabudana Khichdi तयार झाली आहे.आता हि Sabudana Khichdi एका प्लेट मध्ये काढून घ्या त्यावर मस्तपैकी दही टाका आणि शेजारी एक लिंबाची फोड ठेवा आणि तळलेल्या दोन मिरच्या ठेवून गार्निश करा.

प्रो टिप्स:-

 • साबुदाणा भिजण्यासाठी शक्यतो ४-५ तास लागतात पण चांगला भिजला आहे कि नाही याची खात्री व्हावी म्हणून ६-७ तास भिजू द्यावा शक्यतो जर आल्याला उद्या खिचडी बनवायची असेल तर आज रात्रीच भिजवून ठेवावा म्हणजे साबुदाणा चांगला भिजतो आणि खिचडी चांगली होते.
 • आमच्या भागात कढीपत्ता आणि कोथिंबीर उपवासाला चालत नाही पण बरेच ठिकाणी वापरतात जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता.
 • जर तुम्हाला दही आवडत असेल तर तर तुम्ही Sabudana Khichdi बरोबर दही खाऊ शतक दह्याबरोबर खिचडी खायला खूप छान  लागते.तुम्हाला नको असल्यास तुम्ही दही वगळू शकता.
 • Sabudana Khichdi बनवताना त्यात थोडीशी साखर घाला म्हणजे त्याला थोडासा गोडसर पण पण येतो आणि साखरेमुळे त्याला छान  रंग सुद्धा येतो.
 • Sabudana Khichdi बनवताना त्यावर झखान ठेवू नये म्हणजे खिचडी छान मोकळी होते.

सारांश:-

Sabudana Khichdi हा एक पारंपरिक पदार्थ आहे जो संपूर्ण देशहरात उपवासासाठी चा स्नॅक म्हणून प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो कशी वाटली आजची आपली Sabudana Khichdiआपल्याला हि रेसिपी नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो .अशाच नवनवीन रेसिपीस आम्ही आपणासाठी घेऊन येत राहणार आहोत आपल्या या मराठी ड्रीम वर्ल्ड या वेबसाईट  वर तर बनवत रहा खात रहा आणि आम्हाला आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच देत राहा.

Signing Off 

Marathi Dream World Recipes 

Palak Paneer Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

Masala dosa Recipe 👈👈पहाण्यासाठी इथे क्लीक करा 

Pav Bhaji Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

Misal Pav Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

Rajma Chawal 👈👈👈हि रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

Veg Pulao 👈👈👈हि रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

Dal khichadi Recip👈👈👈पाहण्यासाठी येथे क्लीक करा .

Thatte idli👈👈👈हि रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लीक करा 

Butter Paneer Masala

 

5/5 - (5 votes)

Leave a Comment