Special Healthy Dal khichdi Recipe-Easy Perfect Moong dal khichdi In Just 1 Step

नमस्कार, मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे आपला आपल्या या Marathi Dream World Recipes या वेबसाईट वर.तर मित्रांनो रोज आम्ही आपल्यासाठी खमंग , रुचकर आणि चविष्ट अशा रेसिपीस घेऊन येत असतो तुम्हाला त्या खूपच आवडत असतील अशी आशा करतो.तर आज आम्ही आपल्यासाठी आणलेली आहे Special Healthy Dal khichdi Recipe.

हि रेसिपी आपण menu icon  वर क्लीक देऊन आपण आपल्या मनपसंत आपल्याला हव्या त्या भाषेत बघू शकता हि रेसिपी आपल्याला मराठी, पंजाबी, हिंदी, english ,तामिळ, तेलगू ,गुजराथी आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

जर तुम्ही बनवायला सोपी, पोटाला हलकी, पचायला सोपी  स्वादिष्ट रेसिपी शोधत असाल तर हि स्पेशल मूग Dal khichdi हि रेसिपि तुमच्यासाठीच आहे.मूग डाळ खिचडी हि भारताची पारंपरिक रेसिपी आहे जरी हि खूप जुनी असली तरी आजही भारतात बऱ्याच घरामध्ये हि मुगडाळ खिचडी बनवली आणि खाल्ली जाते.

डॉक्टर लोक सुद्धा बऱ्याच रूग्णांना हि Dal khichdi खाण्याचा सल्ला देतात कारण हि जितकी चविष्ट तितकीच आरोग्यासाठी पौष्टिक आहे. तसे डाळ खिचडी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत पण आपण आज पारंपरिक डाळ खिचडी म्हणजेच मूग डाळ खिचडी कशी बनवतात हे पाहणार आहोत. हि डाळ खिचडी प्रामुख्याने मुगडाळ आणि तांदूळ यांच्यापासून बनवतात.चला तर मग मित्रांनो सुरु करूयात आपली स्पेशल Dal khichdi बनवायला.

Moong Dal Khichadi
Dal Khichdi

Special Healthy Dal khichdi Recipe.

डाळ खिचडी बनवण्यासाठीचे साहित्य:-

 • १ वाटी बासमती तांदूळ
 • अर्धी वाटी मूग डाळ
 • १ मोठा कांदा उभा पातळ चिरलेला
 • २ टोमॅटो माध्यम आकारात चिरलेले 
 • ७-८ लसणाच्या पाकळ्या
 • १ इंच आल्याचा तुकडा बारीक किसलेले
 • १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
 • अर्धा चमचा जिरे
 • अर्धा छोटा चमचा मोहरी
 • अर्धा छोटा चमचा हळद
 • १ छोटा चमचा गरम मसाला
 • चवीनुसार मीठ
 • १ तांब्या पाणी
 • २ चमचे तूप

डाळ खिचडी बनवण्याची कृती:-

moong dal ani tandul

Pav Bhaji Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

तर मित्रांनो सर्वप्रथम आपण एका भांड्यात मुगडाळ आणि तांदूळ ३-४ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे तांदुळातला कचरा आणि त्यावर असलेली पावडर म्हणजेच तांदुळाचा स्टार्च निघून जाईल.तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण हे तांदूळ कमीतकमी ३० मिनिटे स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत.

३० मिनिटे भिजवून घेणे

Masala dosa Recipe 👈👈पहाण्यासाठी इथे क्लीक करा 

आता आपण प्रेशर कुकर हे २ चमचे तूप घालून माध्यम आचेवर गरम करायला ठेवणार आहोत.तूप गरम झाल्यानंतर सर्वप्रथम आपण यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊयात मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा जिरे घालून घेऊ.

जिरे घातल्यानंतर आपण यामध्ये पातळ उभा चिरलेला कांदा घालून घेऊ. १ ते २ मिनिटे कांदा  परतल्यानंतर कांदा थोडासा गुलाबी रंग आल्यानंतर थोडासा मऊ झाल्यानंतर आपण ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेऊन टाकू.आता यामध्ये आपण किसलेले आलं आणि बारीक चिरलेली मिरची घालुयात आणि १ ते २ मिनिटे परतून घेऊयात. यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो गाळ होईपर्यंत परतून  घेऊयात .

आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद , अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकुयात आणि मग यात आपण भिजवलेले तांदूळ आणि मुगडाळ टाकून घेऊयात यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सगळं मिश्रण २ ते ३ मिनिटे परतून घेऊयात.

आता पाणी घालून प्रेशर कुकरचे झाकण लावून घेऊयात आणि ३ ते ४ शिट्ट्या वाजल्यानंतर गॅस बंद  करूयात.प्रेशर कुकरची हवा नैसर्गिक रित्या बाहेर गेल्यानंतर कुकरउघडूयात आता आपली मूग दाल खिचडी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

या तयार झालेल्या खिचडी वर गरमागरम तुपाची धार सोडा मस्त खमंग वास येईपर्यंत आणि आता एका प्लेट मध्ये हि Dal khichdiकाढून घ्या यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात.आणि कैरीचं लोणचं किंवा तळलेल्या मिरच्या आणि उडीद डाळीचे पापड याबरोबर आपली मुगडाळ खिचडी सर्व्ह करूयात .

डाळ खिचडी खाण्याचे फायदे:-

 • Dal khichdiआपल्या दैनंदिन आहारात खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यातील काही फायदे आज मी तुम्हाला सांगणार आहे.
 • Dal khichdi मध्ये जी मूगडाळ वापरलेली असते त्या मूगडाळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.या फायबरमुळे हि खिचडी पचायला हलकी असते .
 • Dal khichdiमध्ये फॅटी ऍसिड आणि कॅलरीज झीप कमी प्रमाणात असतात यामुळे आपला वजन वाढत नाही आणि आपले पोट पण भरते ज्या लोकांना वजन कमी करण्याची इच्छा आहे त्या लोकांसाठी डाळ खिचडी खूप फायदेशीर आहे.
 • शरीराच्या सर्व गरज पूर्ण करणारे घटक म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स या डाळ खिचडी मध्ये असतात.
 • रुग्णांना डॉक्टर हलका आहार घेण्याचा सल्ला देतात त्यामध्ये प्रामुख्याने Dal khichdiखाण्याचा सल्ला दिला जातो.रुग्णांसाठी डाळ खिचडी हा जेवण म्हणून उत्तम पर्याय आहे.

सारांश:-

पारंपरिक मूग डाळीची खिचडी हि एक बनवायला अतिशय सोपी, पौष्टिक,आणि चवदार रेसिपी आहे .दिवसातून कधीही आपण या मूग डाळ खिचडी चा आनंद घेऊ शकतो. जर तुम्हाला स्वयंपाक येत असेल किंवा नसेल तरीही तुम्ही हि डाळ खिचडी आमची रेसिपी वापरून बनवू शकता. हि मूग डाळ खिचडीची रेसिपी आपल्या सर्व आवडत्या पदार्थात नक्कीच मानाचं  स्थान मिळवेल हि आशा व्यक्त करतो आपल्याला हि रेसिपी नक्कीच आवडेल आणि आपण मूग डाळ खिचडी घरी नक्कीच बनवून बघाल तर बनवत रहा खात रहा आणि आपले आशीर्वाद आम्हाला असेच देत रहा

Butter Paneer Masala

 

Signing off

Marathi Dream World Recipe’s 

 

 

 


 

 

 

 

 

5/5 - (7 votes)

1 thought on “Special Healthy Dal khichdi Recipe-Easy Perfect Moong dal khichdi In Just 1 Step”

Leave a Comment