Veg Pulao Recipe In Marathi Only 10 Easy steps-व्हेज पुलाव रेसिपी इन मराठी

नमस्कार,मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आपल्या मराठी ड्रीम वर्ल्ड वेबसाईट वर  पाहणार आहोत Veg Pulao रेसिपी हि रेसिपी आपण आपल्याला हव्या त्या आपल्या मनपसंत भाषेमध्ये पाहू शकता जस्ट Main Menuवर क्लीक करा आणि आपल्याला हवी ती भाषा निवड हि रेसिपी मराठी, हिंदी, English ,तामिळ, तेलगू, पंजाबी, गुजराथी आणि उर्दू इतक्या भाषांमध्ये उपलब्ध आहे,

Veg Pulao भारतातील एक लोकप्रिय पदार्थ जो प्रामुख्याने तांदूळ आणि विविध पौष्टिक भाज्या आणि सुगंधी मसाले यांच्या मिश्रणाने बनवला जातो. व्हेज पुलाव हा शब्द तास फार जुना नाही अगदी मधल्या काळात या शब्दाचा जन्म झाला असावा पण शब्द जुना नसला तरी रेसिपी मात्र खूप जुनी आहे फार पूर्वीपासून आपण या पदार्थाला मसाले भात  म्हणून ओळखतो आहोत.

तर आज आपण व्हेज पुलाव कसा बनवायचा ,त्याची चव वाढवता कशी येईल तो अगदी सोप्प्या पद्धतीने कसा बनवायचा, त्याला बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते हे पाहणार आहोत. हा Veg Pulao आपल्या चविष्ट रेसिपींमध्ये नक्कीच भर घालणार आहे.हा Veg Pulao  आपल्याला नक्कीच आवडेल अशी अशा करतो.चला तर मग सुरुवात करूयात Veg Pulao रेसिपीला.

Veg Pulao Recipe In Marathi
Veg Pulav Recipe In Marathi

Veg Pulao Recipe In Marathi-व्हेज पुलाव 

साहित्य:-
स्वादिष्ट व्हेज पुलाव तयार करण्यासाठी तुम्हाला खालील घटकांची आवश्यकता असेल:

 • बासमती तांदूळ – २ वाट्या 
 • २ गाजर बारीक चिरून 
 • बटाटा १ मोठ्या फोडी करून 
 • घेवडा अर्धी वाटी 
 • ढोबळी मिरची बारीक चिरलेली अर्धी वाटी 
 • वाटाणा अर्धी वाटी 
 • शेंगदाणे पाव वाटी 
 • कांदा – १, मध्यम आकाराचा, उभा पातळ चिरलेला
 • १ टोमॅटो बारीक चिरलेला 
 • आले-लसूण पेस्ट १ चमचा 
 • हिरव्या मिरच्या २, उभ्या मध्ये चिरलेल्या 
 • जिरे १ चमचा 
 • तमालपत्र  १
 • दालचिनीचा तुकडा १ इंच 
 • लवंगा  ३-४
 • काळे मिरे ७-८
 • लहान वेलदोडे ३-४
 • मोठी वेलची १
 • हळद अर्धा चमचा 
 • गरम मसाला १ चमचा 
 • चवीनुसार मीठ 
 • तेल २ मोठे चमचे 
 • तूप २ चमचे ( कढवलेलं)
 • ताजी कोथिंबीर बारीक चिरलेली गार्निशिंगसाठी

Palak Paneer Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

कृती:-

स्टेप १:-

बासमती तांदूळ ३-ते ४ ला वेगवेगळ्या पाण्यामधून स्वच्छ धुवा. त्यातील असणारा स्टार्च पूर्णपणे काढून टाका तांदूळ साधारण ३० मिनिटे पाण्यात भिजवुन बाजूला ठेवा.

स्टेप २:-

एका खोल कढईमधे किंवा प्रेशर कुकरमध्ये तेल आणि तूप मध्यम आचेवर गरम करा. जिरे टाका जिरे तडतडल्यानंतर त्यात १ तमालपत्र टाका ,दालचिनीचा तुकडा ,३ते ४ लवंगा ,७ ते ८ काळे मिरे  १ मोठी वेलची आणि ३ ते ४ हिरवे वेलदोडे टाका , तमालपत्र, दालचिनी, लवंगा आणि वेलदोडे  यांना सुगंध सुटेपर्यंत काही सेकंद परतून घ्या.

स्टेप ३:-

नंतर बारीक बारीक उभा चिरलेला कांदा घाला आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या . नंतर यामध्ये आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची चिरून टाका. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत २-३ मिनिटे हलवत रहा.

स्टेप ४:-

आता यामध्ये १ चिरलेला बटाटा ,२ ढोबळी मिरची चिरलेली, २गाजर  चिरलेले , हि वाटी घेवडा, अर्धी वाटी वाटाणा आणि पाव वाटी शेंगदाणे घालून ह्या भाज्या ३ ते ४ मिनिटे थोड्याशा मऊ होईपर्यंत परतून घ्या.

स्टेप ५:-

आता भिजवून ठेवलेल्या तांदुळातले पाणी काढून कढईमधे टाका आणि हलक्या हाताने हलवून घ्या म्हणजे मसाले आणि आपण परतलेल्या सगळ्या भाज्यांमध्ये  तांदूळ समान रीतीने कोट होईल.

Masala dosa Recipe 👈👈पहाण्यासाठी इथे क्लीक करा 

स्टेप ६:-

आता या तांदळावर हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र हलवा.

स्टेप ७:-

आपण २ वाट्या बासमती तांदूळ घेतला होता १ वाटी तांदुळाला दीड पेला पाणी या हिशोबाने ३ पेले पाणी घाला.(तुम्ही जो तांदूळ वापरात असाल त्याला किती पाणी लागते याचा विचार करून पाणी घाला)

स्टेप ८:-

आता या सगळ्या मिश्रणाला उकळी येईपर्यंत गॅस वाढवा आणि उकळी आल्यानंतर गॅस माध्यम आचेवर ठेवून कढईवर झाकण ठेवा.आता आपला पुलाव मंद आचेवर १२ ते १५ मिनिटे शिजू द्या आता या तांदळाचा शीत अन शीत वेगळा झाला असेल एक शीत हाताच्या चिमटीमध्ये दाबून तांदूळ शिजला आहे का चेक करा.तांदूळ जवळपास ८० टक्के शिजला असला पाहिजे (पूर्ण मऊ होईपर्यंत १०० टक्के शिजवू नका).

स्टेप ९:-

तांदूळ शिजल्यावर, गॅस बंद करा आणि आणखी 5 मिनिटे झाकून राहू द्या. यामुळे पुलाव मध्ये मसाल्याचे सगळे फ्लेवर्स उतरतात.

स्टेप १०:-

आता पुलाव मोठ्या चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने हलवा तांदळाचे शीत तुटणार नाहीत याची काळजी घ्या. आपला Veg Pulao तयार झाला आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस टाकून गार्निश करा.

Pav Bhaji Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

 

आपल्या Veg Pulao ची चव वाढवण्यासाठी काही प्रो टिप्स:-

बासमती तांदूळ:- लांबलचक बासमती तांदूळ निवडा  ज्याचे शीत एकमेकांना चिकटणार नाहीत असा यामुळे आपल्या Veg Pulao ची कॉलीटी वाढेल .व्हेज पुलाव बनवण्यासाठी डावात बासमती हा उत्तम तांदूळ मानला जातो.

तांदूळ भिजवणे:- शिजवण्यापूर्वी तांदूळ भिजवल्यास अतिरिक्त स्टार्च काढून टाकण्यास मदत होते आणि तांदूळ समान  प्रमाणात शिजतो.. आणि तांदुळाचा शीत आणि शीत वेगळा होतो.

भाजीपाला निवड:- आपला Veg Pulao आकर्षक दिसण्यासाठी गोल मटोल आणि रंगीबेरंगी भाज्यांची निवड करा वर्षाच्या १२ महिन्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या मिळतात आपल्या आवडीनुसार आपण त्यांचा वापर करू शकतो.

मसाल्याची चव:-आपल्या चवीनुसार आपण गरम मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो जर आपल्याला जास्त तिखट आवडत नसेल तर आपण हिरव्या मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतो किंवा पूर्णपणे वगळूसुद्धा शकतो.

एक्सट्रा फ्लेव्हर्स:-: चव वाढवण्यासाठी, तुम्ही बादलफूल किंवा जायफळ असे मसाले तुमच्याचविनुसार वापरू शकता.

Misal Pav Recipe👈👈पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

सारांश:-

Veg Pulao हि एक चवदार आणि सुगंधी रेसिपी आहे .ज्याचा स्वतंत्र जेवण म्हणून किंवा विविध प्रकारच्या करी आणि रायत्यांसोबत आनंद घेता येतो. मसाल्यांचे सुगंधित मिश्रण, रंगीबेरंगी भाज्या आणि बासमती तांदुळाचा सुट्टा झालेला एक एक शीत यांचा मिश्रण आपल्या चवीमध्ये भर टाकण्याचे काम करते.या ब्लॉग मध्ये  दिलेल्या स्टेप बाय स्टेप सूचना आणि प्रो टिप्स फॉलो करून, तुम्ही एक उत्कृष्ट व्हेज पुलाव तयार करू शकाल जे तुमच्या जिभेची चव नक्कीच वाढवतील  तर चला तर मग लागा तयारीला आणि तुमचा Veg Pulao कसा झाला हे आम्हाला comment करून नक्की कळवा . बनवत रहा खात रहा आणि आम्हाला आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच भरभरून देत रहा हीच विनंती.

Butter Paneer Masala

Signing Off

Marathi Dream World Recipes

5/5 - (10 votes)

Leave a Comment